पुणे पोलिसांची मोठी कारवाई! चंदन चोरी करताना चौघांना अटक

या आरोपीकडून २ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Pune Police
Pune PoliceSaam Tv
Published On

पुणे : पुण्यात (Pune) खडकीतील दारूगोळा कारखाना परिसरात जंगलातून रात्रीच्यावेळी चंदन चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील चौघांना गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने अटक केली आहे. या आरोपीकडून २ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चंदनचोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

Pune Police
नीरज चोप्राने रचला इतिहास! वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदकावर कोरले नाव

अक्षय आरडे, अंत्रोस पवार अकिलाल पारधी, बियरलाल राजपूत अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून माल विकत घेणाऱ्या अण्णा गायकवाड यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी आरडे हा रिक्षा चालक असून तो मुळचा बीडचा (Beed) आहे. या आरोपींनी अजून कुठे अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस (Police) करत आहेत.

Pune Police
Mumbai mega block : मुंबईत 'या' दोन दिवशी रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक!

या आरोपीकडे स्क्रू ड्रायव्हर कटर कुराडी कोयत्यासह हत्यारे असा एक लाख तीन हजाराचा मुद्देमालही आढळून आला आहे. त्यामुळे यातील काही गुन्हेगार अजून कुठल्या गुन्ह्यात सहभागी आहेत का याचा तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com