पुण्यात आज वाहतूक बदल
सकाळी ७ वाजल्यापासून ट्रॅफिक डायव्हर्जन लागू
लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, एम.जी. रोड परिसरात कोंडीची शक्यता
वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन
अक्षय बडवे, पुणे
Pune Traffic Diversion Today Shiv Jayanti Procession पुणेकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आज ६ मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते. यानिमित्त शहरातील मध्यवर्ती भागात मिरवणुका निघणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल केले जाणार आहेत. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी वाहन चालकांनी आजच्या प्रवासाचे नियोजन करून घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ७ वाजल्यापासून लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, पं. जवाहरलाल नेहरू रस्ता आणि बाजीराव रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. मिरवणूक मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून, मिरवणूक पुढे सरकल्यानंतर वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरळीत केली जाणार आहे.
लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता तसेच लष्कर वाहतूक विभागाच्या हद्दीतील एम.जी. रस्ता आणि ईस्ट स्ट्रीट परिसरात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिजामाता चौकातून छत्रपती शिवाजी महाराज रस्तामार्गे स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्ता- खंडोजीबाबा चौक–लोकमान्य टिळक चौक-टिळक रस्ता हा पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे. मिरवणुका लक्ष्मी रस्त्यावर असताना सोन्या मारुती चौक परिसरातील वाहतूक संत कबीर चौकातून वळवण्यात येईल. कसबा पेठेतील गणेश रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद असून, ती वाहतूक दारुवाला पूल चौकातून वळवण्यात आली आहे. तसेच, नारायण पेठेतील केळकर रस्त्यावरील वाहतूक अप्पा बळवंत चौक आणि बुधवार चौकाकडे वळवण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.