Pune News: पीएमपी बसला बाप्पा पावला, गणेशोत्सवात रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न; कर्मचाऱ्यांमध्ये आनंदी आनंद

Pune Pmpml Bus: पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) गणेशोत्सवात घसघशीत कमाई केली.
Pune pmpml bus record break revenue in ganeshotsav 2023
Pune pmpml bus record break revenue in ganeshotsav 2023Saam TV
Published On

Pune Pmpml Bus Revenue

पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) गणेशोत्सवात घसघशीत कमाई केली. गणपती उत्सवाच्या काळात पीएमपी प्रशासनाला तब्बल १९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पीएमपीचे उत्पन्न तब्बल २४ लाखांनी वाढले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. (Latest Marathi News)

Pune pmpml bus record break revenue in ganeshotsav 2023
Accident News: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कंटेनरची बसला धडक; कंडक्टरचा जागीच मृत्यू

उत्पन्न आणि प्रवासी संख्या वाढत असल्यामुळे ‘पीएमपी’ला दिलासा मिळाला आहे. पुणे शहराची महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून ‘पीएमपी’कडे पाहिलं जातं. दिवसभरात जवळास दहा ते बारा लाख पुणेकर पीएमपी बसमधून प्रवास करतात.

प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ‘पीएमपी’कडून १६५० बसच्या माध्यमातून ३७१ मार्गांवर सेवा दिली जाते. यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान पुण्यात रात्रभर ‘पीएमपी’ बससेवा सुरू होती. त्यामुळे भाविकांना वेळेवर बाप्पाचं दर्शन घेता आलं.

कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र न बघता ‘पीएमपी’ सेवा सुरळीत ठेवली. गणेशोत्सवात पुणे शहरासह उपनगरात ‘पीएमपी’च्या ६७२ अतिरिक्त बस सुरू होत्या. या बसेसच्या माध्यमातून पीएमपी प्रशासनाला तब्बल १९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Edited by - Satish Daud

Pune pmpml bus record break revenue in ganeshotsav 2023
Harbour Train News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी, हार्बर मार्गावर तब्बल ३८ तासांचा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com