Pimpri Chinchwad Crime : पिंपरीतील १८ वर्षीय तरुणीचा शेजाऱ्यानेच काटा काढला, परराज्यातील मामा-भाच्याला अटक; हत्येचं कारण समजलं?

Pune Pimpri Chinchwad Crime News : हत्या झालेली तरुणी कोमल जाधव ही पिंपरी चिंचवड परिसरातील वाल्हेकरवाडी परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होती. रविवारी कोमल जाधव घरामध्ये होती. यादव हा तिच्याच शेजारी वास्तव्यास होता.
pune pimpri chinchwad crime news
pune pimpri chinchwad crime news Saam Tv News
Published On

पुणे (पिंपरी-चिंचवड) : पुण्यातील पिंपरी चिंचवडच्या रस्त्यावर मध्यरात्री तरूणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वालेकर वाडी येथे १८ वर्षांच्या तरूची धारधार शस्त्राने सपासप वार करत हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रसंगाचा सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागलाय. या प्रकरणी पोलिसांनी मामा भाच्याला दोघांना ताब्यात घेतलं आहे. कोमल भरत जाधव (वय १८) असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. उदयभान यादव (वय ४५) आणि त्याचा सख्खा भाचा या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. उदयभान यादव हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हत्या झालेली तरुणी कोमल जाधव ही पिंपरी चिंचवड परिसरातील वाल्हेकरवाडी परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होती. रविवारी कोमल जाधव घरामध्ये होती. यादव हा तिच्याच शेजारी वास्तव्यास होता. त्या दोघांमध्ये आर्थिक व्यवहारातून वाद झाले होते. त्यामुळे उदयभान याने कोमल हिला संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याने आपल्या भाच्याच्या मदतीने रविवारी रात्री दुचाकीवरून डोक्यात हेल्मेट घालून कोमलला घराच्या बाहेर बोलावून घेतलं. कोमल घराच्या खाली आली, त्यानंतर तिच्यावर शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात कोमलचा जागीच मृत्यू झाला.

pune pimpri chinchwad crime news
Mumbai political: मुंबईत ठाकरे गटाला जबरदस्त धक्का, महत्त्वाच्या शिलेदाराने निवडणुकीपूर्वीच सोडली साथ

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मयत कोमल जाधव आणि आरोपी हे शेजारी राहत होते. त्या दोघांमध्ये संबंध होते. त्यांच्यामध्ये आर्थिक व्यवहारही झाले होते. त्यातूनच दोघांमध्ये वाद झाले होते. त्यानंतर आरोपीने भाच्याच्या मदतीने हत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर वाल्हेकरवाडी परिसरात भीतीचं वातावरण पसरल आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.

pune pimpri chinchwad crime news
Unseasonal Rain : राज्याला अवकाळीचा तडाखा! वीज पडून अनर्थ, ६ जणांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com