पार्किंगच्या नावाखाली पुणेकरांची सर्रास लूट; 3 रुपयांच्या नावाखाली 30 रुपयांची वसुली

Pune Parking Scam Exposed: राज्यातील सर्वच शहरात वाहनांची संख्या वाढत चाललीय...अशातच वाहनतळावर पार्किंगच्या नावाखाली पुणेकरांची सर्रास लूट होतेय...दरपत्रक नसल्यानं पार्किंग चालक आणि ठेकेदार पुणेकरांची कशी लूट करतायत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Pune parking scam
Pune parking scamSaam tv
Published On: 

पुणे शहरात वाहनांची वाढती संख्या आणि त्यामुळे निर्माण होणारी पार्किंगची समस्या आता नवीन राहिलेली नाही. मात्र, या समस्येचा गैरफायदा घेऊन पुणेकरांची आर्थिक लूट सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.... पुणे महापालिकेने निश्चित केलेले पार्किंगचे अधिकृत दर आणि प्रत्यक्षात ठेकेदारांकडून वसूल केली जाणारी रक्कम यात प्रचंड तफावत असल्याचा पर्दाफाश झालाय. 'साम टीव्ही'च्या इन्व्हेस्टीगेशनमध्ये हा लुटीचा काळाबाजार आणि ठेकेदारांची मुजोरी चव्हाट्यावर आलीय...

या साऱ्या लुटीचा पर्दाफाश करण्यासाठी सामच्या प्रतिनिधीनं महापालिकेच्या पार्किंगसह शहारातल्या प्रमुख पार्किंगच्या ठिकाणांचा आढावा घेतला...त्यावेळी 14 रुपयांच्या पार्किंगसाठी तब्बल 60 रुपये नागरिकांकडून घेतल्याचा प्रकार समोर आला... मात्र मुजोर ठेकेदारांशी भांडण्याचा काहीच अर्थ नाही, अडला हरी गाढवाचे पाय धरी, असा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिलीय..

दरम्यान पुणे महापालिकेनं निश्चित केलेले पार्किंगचे दर किती आहेत? आणि नागरिकांची कशी आर्थिक लूट होतेय..पाहूयात...

पार्किंगच्या नावाखाली

पुणेकरांची लूट

3 रुपयांच्या पार्किंगसाठी थेट 30 रुपये

चारचाकीसाठी 14 ऐवजी 60 रुपयांची वसुली

काही वाहनतळांवर 100 रुपयांपर्यंत दर आकरले जातात

अनेक पार्किंगमध्ये दरपत्रक गायब आणि पावती मागितल्यावरच मिळते

अनेक ठिकाणी ऑनलाइन पेमेंटची सुविधाही नाही

ठेकेदारांच्या मुजोरीवर महापालिकेचे नियंत्रण नाही

मुळात महापालिकेनं पार्किंगचे ठेके दिलेत... मात्र ठेकेदार वाहनतळांवर दरपत्रक लावत नाहीत... पावतीवर घेतलेल्या पैशांची नोंद नसते. त्यामुळे नागरिकांची लूट थांबवावी अशी मागणी वेगवेगळ्या संघटनांकडून केली जातेय... दुसरीकडे पार्किंगसाठी नागरिकांकडून जादा पैसे घेत नसल्याचा दावा पार्किंग व्यवस्थापकाकडून केला गेलाय...

एकीकडे पुणेकरांकडून महापालिकेला विविध प्रकारचे कर आणि शुल्क भरले जातात. मात्र, पार्किंगसारख्या मूलभूत सुविधेसाठीही नागरिकांची लूट सुरू असेल तर जबाबदार कोण? महापालिकेच्या नाकाखाली ही लूट असताना यावर ना कोणती कारवाई होत ना ठेकेदारांची मुजोरी थांबत. त्यामुळे पुणेकरांची सुरू असलेली ही लूट तातडीनं थांबवून या लुटारूंच्या टोळींना चाप लावण्याची गरज आहे. मात्र महापालिका ही लूट थांबवणार का? याकडे पुणेकरांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.