Tamhini Ghat News : स्टंट करायला गेला अन् बुडाला, ताम्हिणी घाटात तरुण गेला वाहून, थरारक VIDEO

Young Man Drowned in Tamhini Ghat : सहलीसाठी आलेला एक तरुण ताम्हिणी घाटातील धबधब्यात बुडाला आहे. स्वप्नील धावडे असं या तरुणाचं नाव आहे.

लोणावळ्यातील भुशी डॅम येथे एकाच कुटुंबातील ५ जण वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच आता ताम्हिणी घाटातही अशाच प्रकारची घटना घडली आहे. सहलीसाठी आलेला एक तरुण ताम्हिणी घाटातील धबधब्यात बुडाला आहे. स्वप्नील धावडे असं या तरुणाचं नाव आहे.

सध्या बचाव पथकाचे जवान त्याचा शोध घेत आहेत. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील हा आपल्या जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता. धबधब्यातील पाणी पाहून त्याला पोहण्याचा मोह आवरला नाही.

त्याने स्टंट करण्याच्या नादात पाण्यात उडी घेतली. पण खोल पाण्यात पडल्यानंतर तो बुडू लागला. त्याच्या सोबत असलेल्या इतर मित्रांनी आरडाओरड सुरू केली. मात्र, स्वप्नील हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. या भयानक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com