Pune News: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'या' दिवशी पाणीपुरवठा बंद, पाणी जपून वापरा

Pune Water Supply: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. गुरूवारी पुण्यात कल्याणीनगर,कळस भागात पाणीपुरवठा बंद असणार आहे.
Pune News
Pune NewsYandex
Published On

सचिन जाधव

Pune Water Supply Closed on Thursday

पुणे (Pune) शहरावर पाणी टंचाईचं संकट आहे. परंतु अजून पाणी कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. परंतु अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात कल्याणीनगर, कळस भागात गुरुवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरण्याची गरज आहे. (Latest Pune News)

पाणीपुरवठा बंद का असणार आहे, असा प्रश्न निर्माण होत (Pune Water Supply) आहे. भामा आसखेड प्रकल्पांतर्गत कुसमाडे वस्ती येथील नवीन टाकीला मुख्य जलवाहिनी जोडणे आणि ठाकरसी टाकीवरील स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी गुरुवार कळस, माळवाडी, कल्याणीनगर, विमानतळ, रामवाडीसह इतर भागातील पाणी पुरवठा बंद असणार आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुरूवारी पाणीपुरवठा बंद असणारा भाग

शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु होईल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागातर्फे देण्याची आली आहे. त्यामुळे पुन्हा पुणेकरांना काहीसा दिलासा मिळालेला (Pune Water Supply Closed on Thursday) आहे. गुरूवारी पाणीपुरवठा बंद असल्याने अगोदरच पाण्याचं नियोजन करण्याची गरज आहे.

आदर्शनगर, कल्याणीनगर, हरीनगर, रामवाडी, शास्त्रीनगर, संपूर्ण गणेशनगर, म्हस्के वस्ती परिसर, कळस, माळवाडी, जाधव वस्ती, विशाल परिसर, विश्रांतवाडी सर्वे क्रमांक ११२ अ, कस्तुरबा, टिंगरेनगर पंप ते विश्रांतवाडी चौक, जयजवान नगर, जय प्रकाशनगर (Pune News), संजय पार्क, विमानतळ, यमुना नगर, दिनकर पठारे वस्ती, पराशर सोसायटी, श्री पार्क, ठुबे पठारे नगर या भागात पाणीपुरवठा बंद असणार आहे.

Pune News
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोली एक्‍झिटपासून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद, पर्यायी मार्ग काय?

मुंबईमध्ये पाणीपुरवठा बंद

मुंबईमध्ये काही भागांत १०० टक्के तर काही भागांत ३० टक्के पाणीपुरवठा बंद करण्यात येत आहे. पिसे येथील उदंचन केंद्रात संयंत्राला आग लागल्याने मुंबई शहर आणि पूर्व उपनगरामधील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बाधित झाला (Water Supply) आहे. पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे नागरिकांना आवाहन, केलं जात आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पिसे येथील जल उदंचन केंद्रात संयंत्राला आग लागण्याची घटना २६ फेब्रुवारी २०२४ रोजी झाली. संबंधित भागांमधील नागरिकांनी पाणी जपून वापरावं, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

Pune News
Pune Defense Expo: संरक्षण उद्योगांना चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com