Mumbai Water cut : मुंबईकरांनो! पाणी जपून वापरा; शहरातील काही भागात पाणीपुरवठा बंद तर काही भागात पाणी कपात

Mumbai Water cut: मुंबई शहराच्या काही भागात पाणी कपात होणार आहे तर काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद असणार आहे. मुंबई पालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या पिसे येथील पाणी उदंचन केंद्रामध्ये अचानक आगीची दुर्घटना घडल्यामुळे पाणीपुरवठा राहणार बंद
Mumbai Water cut
Mumbai Water cutSaam Tv
Published On

Mumbai Municipal Corporation Mumbai Water cut:

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शहरातील पाणीपुरवठ्यात मोठी कपात केली जाणार आहे. अनेक ठिकाणी राहणार पाणीपुरवठा बंद तर काही ठिकाणी ३० टक्के पाणी कपात केली जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेने प्रसिध्दी पत्रक काढून याविषयीची माहिती दिलीय. (Latest News)

मुंबई पालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या पिसे येथील पाणी उदंचन केंद्रामध्ये अचानक आगीची दुर्घटना घडल्यामुळे पाणीपुरवठा राहणार बंद राहणार आहे. मुंबई पूर्व उपनगरातील पूर्वेचा भाग, ट्रॉम्बे निम्नस्तरीय जलायशय, ट्रॉम्बे उच्च जलाशय घाटकोपर निम्नस्तरीय जलाशय तसेच शहर विभागातील एक दक्षिण आणि एफ उत्तर गोलंजी फोसबेरी, राओली, भंडारवाडा या जलाशयातून होणारा पाणी पुरवठा आज मध्यरात्रीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहील. तसेच उर्वरित शहर विभाग पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरमधील पाणीपुरवठ्यात ३० टक्के कपात करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) आपल्या प्रसिद्धीपत्रकात दिलीय.

टी विभाग पूर्व व पश्चिम भागात शंभर टक्के पाणीपुरवठा बंद राहील. एस विभाग नाहूर पूर्व, भांडूप पूर्व, विक्रोळी पूर्व या भागातही शंभर टक्के पाणीपुरवठा बंद राहील. एन विभाग विक्रोळ पूर्व, घाटकोपर, पूर्व आणि सर्वोदय नगर, नारायण नगरमध्ये ही पूर्णपणे पाणीपुरवठा बंद असेल. एम पूर्व व एम पश्चिम संपूर्ण विभागतही शंभर टक्के पाणीपुरवठा बंद असेल.

यासह एफ दक्षिण आणि एफ उत्तर संपूर्ण विभागात तसेस भंडारवाडा जलाशयातू होणारा पाणीपुरवठा ई विभाग बी विभाग, ए विभागात देखील १०० टक्के पाणीपुरवठा बंद असेल. तर उर्वरित महानगरपालिकेतील विभाग, पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि शहर विभागात ३० टक्के पाणी कपात केली जाणार आहे.

Mumbai Water cut
IMD Rain Alert : राज्यभरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, प्रचंड गारपीट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com