Pune News: नाटकाचा प्रयोग पाहण्यात दंग, अचानक महिला प्रेक्षकाच्या कपड्यात शिरला उंदीर, अन्...

Yashwantrao Chavan Natyagruha Pune: पुण्यातल्या कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये भयंकर घटना घडली. नाटकाचा प्रयोग सुरू असताना अचानक महिला प्रेक्षकाच्या कपड्यात उंदीर शिरला.
Pune News: नाटकाचा प्रयोग पाहण्यात दंग, अचानक महिला प्रेक्षकाच्या कपड्यात शिरला उंदीर, अन्...
Yashwantrao Chavan Natyagruha PuneSaam Tv
Published On

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये नाटकाच्या प्रयोगादरम्यान एक भयंकर घटना घडली. नाटक सुरू असताना एका महिला प्रेक्षकाच्या कपड्यामध्ये अचानक उंदीर शिरला त्यामुळे एकच गोंधळ उडाला. पुण्यातील नाट्यगृहात उंदीर-घुशींच्या उपद्रवाचा कळस गाठणारी ही धक्कादायक घटना समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. हा किळसवाणा प्रकार पुण्यातल्या कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये घडला.

पुण्यातील यशवंतराव नाट्यगृहात उंदरांमुळे प्रेक्षकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. ३१ मे रोजी या नाट्यगृहामध्ये 'मूषक' या नाटकाचा प्रयोग सुरू होता. हे नाटक पाहण्यासाठी एक महिला आपल्या कुटुंबीयांसोबत आली होती. त्यावेळी अचानक महिलेच्या साडीमध्ये उंदीर शिरला. या घटनेमुळे नाटक सुरू असताना एकच गोंधळ उडाला. उंदराची नखे पायाला लागल्याने संसर्ग टाळण्यासाठी या महिला प्रेक्षकाला इंजेक्शन घ्यावे लागले.

Pune News: नाटकाचा प्रयोग पाहण्यात दंग, अचानक महिला प्रेक्षकाच्या कपड्यात शिरला उंदीर, अन्...
Shocking News: ४ सुनांची सासू ३० वर्षांच्या बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच पाठवलं पत्र

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ९.३० वाजताच्या प्रयोगावेळी ही घटना घडली. नाटकाचा प्रयोग सुरू होऊन १० ते १५ मिनिटे झाले असतानाच अचानक एका महिला प्रेक्षकाच्या कपड्यांमध्ये उंदीर शिरला. मात्र या महिलेने प्रसंगावधान दाखवत कोणताही गोंधळ न करता प्रेक्षकगृहाच्या बाहेर येत स्वच्छतागृहाकडे धाव घेतली. हा उंदीर बाहेर काढण्यासाठी १५ ते २० मिनिटं गेली.या महिलेच्या पतीने अतिशय कठीण परिस्थितीत अत्यंत संयमाने ही घटना हाताळली.

Pune News: नाटकाचा प्रयोग पाहण्यात दंग, अचानक महिला प्रेक्षकाच्या कपड्यात शिरला उंदीर, अन्...
Shocking News: बूट घालण्यासाठी बॉक्स उघडला अन् पाहून हादरला, अचानक बुटातून निघाला मोठा नाग; पाहा VIDEO

या किळसवाण्या प्रकारानंतर या महिला प्रेक्षकासह त्यांच्या कुटुंबीयांना पुन्हा नाटक पाहण्याची अजिबात इच्छा नव्हती. ते नाटक न पाहताच आपल्या घरी निघून गेले. याबाबत महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त यांनी आज तातडीची बैठक बोलावली. सुदैवाने उंदराने जोरात चावा न घेतल्यामुळे महिला प्रेक्षकाला अधिक गंभीर धोका निर्माण झाला नाही. ही घटना अतिशय गंभीर आहे. यशवंतराव नाट्यमंदिराच्या व्यवस्थापनाने त्वरीत याची दखल घेऊन उंदरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

Pune News: नाटकाचा प्रयोग पाहण्यात दंग, अचानक महिला प्रेक्षकाच्या कपड्यात शिरला उंदीर, अन्...
Shocking News: विद्युत पंप सुरू करताना शेततळ्यात पडली, महिलेला वाचवण्यात यश; पण मदतीसाठी गेलेल्या नवऱ्यासह दोघांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com