Pune Hotel News : बंदुकीचा धाक दाखवून FC रोडवरील प्रसिद्ध हॉटेलचा ताबा, पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल

Pune Crime News : पीडितेच्या तक्रारीनंतर लग्नानंतरही मारहाण करुन शारीरीक व मानसिक छळ केला.
Pune Shivajinagar Police station
Pune Shivajinagar Police stationSaam TV
Published On

Pune News : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील एका प्रसिद्ध हॉटेलचा बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने ताबा घेतल्याची घटना समोर आली आहे.

महिलेच्या तक्रारीनुसार तिचा शारीरिक, मानसिक छळ देखील करण्यात आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार विवाहित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 2018 मध्ये घरी दारु व ड्रग्ज पाजून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्नानंतरही मारहाण करुन शारीरीक व मानसिक छळ केला. (Latest Marathi News)

Pune Shivajinagar Police station
Monsoon 2023 Update : राज्यात मान्सून कधीपासून सक्रिय होणार? हवामान विभागाची नवी अपडेट, वाचा सविस्तर

पतीने बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने पॉवर ऑफ अॅटर्नी करुन वडिलांचे हॉटेल नावावर करुन घेतल्याचा आरोप महिलेने केला आहे. लग्नातील 1.70 कोटींचे दागिने आणि दोन कार पती व त्याचा भाऊ वापरत असल्याचे आरोपही महिलेने केले आहेत. (Pune NEws)

Pune Shivajinagar Police station
Sanjay Raut News: मणिपूरमध्ये मोदींच्या 'मन की बात'ला विरोध, लोकांनी रेडिओ फोडले; राऊंतांनी VIDEO ट्वीट करत डिवचलं

महिलेच्या तक्रारीवरुन या प्रकरणी पती, दीर, सासू, सासरे यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com