Pune Crime
Pune Crime Saam tv

Pune Crime : एकतर्फी प्रेमातून मुलीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न; घटनेचं CCTV फुटेज आलं समोर

Pune Crime News in marathi : पुण्यात सदाशिव पेठेत झालेली पुनरावृत्ती टळल्याची घटना घडली. इयत्ता ११ वी मध्ये शिकत असलेल्या मुलीवर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात अडवत कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

अक्षय बडवे, पुणे

Pune Crime News :

पुण्यातून धक्कादायक घटना समोर येत आहे. पुण्यात सदाशिव पेठेत झालेली पुनरावृत्ती टळल्याची घटना घडली. इयत्ता ११ वी मध्ये शिकत असलेल्या मुलीवर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात अडवत कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटनेने पुन्हा एकदा पुण्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे.

पुण्यातील सुभाषनगरमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणाने इयत्त ११ वी शिकत असलेल्या मुलीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मुलगी बोलत नसल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचा संशय आहे.

नागरिकांनी आरडा-ओरडा केल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या या दोन्ही तरुणांनी तातडीने पळ काढला. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात महेश सिद्धप्पा भंडारी आणि त्याच्यासोबत असलेल्या एकावर गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Pune Crime
Crime News : चारित्र्यावर संशय घेत पत्नीसह पोटच्या मुलांची हत्या; तीन दिवस मृतदेहांसोबत राहिला अन्...

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, महेश आणि ती मुलगी हे दोघेही एकमेकांना ओळखतात. मुलगी आणि तिच्या तीन मैत्रिणी दुपारी सुभाषनगर येथील गल्ली क्रमांक ६ येथून जात होत्या. यादरम्यान महेश व त्याचा मित्र येथे आले. महेशकडे कोयता होता. त्याने झालेल्या वादातून त्या मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे असलेल्या नागरिकांनी हे पाहताच आरडा-ओरड केला. त्यामुळे या तरुणांनी तिथून पळ काढला. त्यामुळे सुदैवाने मोठी घटना टळली.

या प्रकरणी पीडित मुलींनी याबाबत पोलिसात कोणतीही तक्रार नोंद करण्यात आलेली नाही. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

Pune Crime
Akola Crime News: जागेचा वाद, गाढ झोपेत असतानाच एकाला संपवलं; अकोल्यातील थरारक घटना

सदाशिव पेठेत तरुणीवर झाला होता हल्ला

तत्पूर्वी, काही महिन्यांपूर्वी पुण्यातील सदाशिव पेठेत पेरुगेट पोलीस चौकीजवळ एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने वार करण्याचे प्रयत्न झाला होता. त्यावेळी काही जागरुक तरुणांनी या तरुणीचा बचाव केला होता. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने आरोपीवर कारवाई केली होती. तर तरुणीचा बचाव करणाऱ्या तरुणांचं सर्वत्र कौतुक झालं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com