Pimpari Chinchwad News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये राज ठाकरे यांनी पिंपरी चिंचवड एडिटर्स गिल्ट आयोजित पत्रकार कायदा विरोधी परिषदेला हजेरी लावली. कार्यक्रमात राज ठाकरे यांनी बदलत्या पत्रकारितेबद्दल चिंता व्यक्त करत भाजप सरकारवर टीका केली.
काय म्हणाले राज ठाकरे?
कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांवर होणारे हल्ले आणि राजकीय दबावाबद्दल चिंता व्यक्त केली. "पत्रकारांवरील हल्ले निषेधार्ह आहेत. आम्हालासुद्धा त्याचा राग आहे. असे म्हणत महाराष्ट्रात अजूनही पत्रकारिता जिवंत असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
ट्रोलिंगवरुन हल्लाबोल...
"ट्रोलिंग करणाऱ्याला काही पडलेली नसते. तुम्ही कशाला वाटून घेता. त्यांना मागच्या पुढचा इतिहास माहीत नसतो. मुलाखत ऐकलेली नसते. बास फक्त व्यक्त व्हायचं. राजकीय लोकांनी पाळलेली लोकं आहेतच. त्या पाळलेल्या लोकांवर कशाला प्रतिक्रिया देता? ते पाळलेले आहेत. त्यांना लिहायचे दर महिन्याला पैसे मिळतात. त्यांचा कसला विचार करता?" असे ते यावेळी म्हणाले.
भाजपला टोला....
"प्रत्येकाचा एक काळ असतो. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नसतो. सत्ता ज्या दिवशी हातात येते, त्याच दिवशी ती जायला लागते. ती टिकवायची किती, तेवढचं तुमच्या हातात असते. विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो. सत्ताधारी पक्ष हारत असतो, असंही राज यांनी नमूद केले.
"पुर्वी पत्रकारांसाठी लढणाऱ्या भाजप पक्षाच्या सत्तेच्या काळातच पत्रकारांवर बंधने लादली जात आहेत, ही चिंताजनक बाब असल्याचे म्हणत भाजपने त्यांचा इतिहास एकदा उलघडून पाहावा.. असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.