Gondia News : चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, युवकास 30 वर्षाचा सश्रम कारावास

या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप इंगळे यांनी केला होता.
gondia News, Court
gondia News, Courtsaam tv
Published On

- शुभम देशमुख

Gondia News : काकाच्या घरी पाळण्यावर एकटी झोका घेत असलेल्या ६ वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष देत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने ३० वर्षांचा सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे. प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी शिक्षा सुनावलेल्या आराेपीचे नाव महेश टेंभुर्णे (Mahesh Tembhurne) (वय ३२) असल्याची माहिती न्यायालयातून देण्यात आली. (Maharashtra News)

gondia News, Court
Mobile Network : माेबाईलला नेटवर्क नसलेलं हेच ते आपल्या महाराष्ट्रातील गाव !

२७ ऑक्टोबर २०२१ ला चिमुकली आपल्या घराशेजारी काकाच्या घरी पाळण्यावर एकटी झुलत होती. ती एकटी असल्याचे पाहून संशयिताने तिला चॉकलेटचे आमिष देत घरामागे असलेल्या शौचालयाच्या खड्ड्याकडे नेले.

gondia News, Court
Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग, माजी नगरसेवकास अटक

चिमुकलीला चॉकलेटकरिता दहा रुपयांची नोट देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर चिमुकली ही घरी रडत रडत आली. तिच्या आईने तिला रडण्याचे कारण विचारता असता तिने घडलेली माहिती दिली.

gondia News, Court
Loksabha Election 2024 : लोकसभेच्या रणांगणात शाहू महाराज छत्रपती? काेल्हापूरसाठी शरद पवारांची रणनिती

पीडितेच्या आईने पोलिस स्टेशनला २७ ऑक्टोबर २०२१ रोजी तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप इंगळे यांनी केला होता. संशयिताच्या वकीलांचा व अतिरिक्त सरकारी वकील कैलाश खंडेलवाल यांच्या सविस्तर युक्तिवादानंतर प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी आरोपीविरुद्ध सरकार पक्षातर्फे सादर साक्षीदारांची साक्ष, वैद्यकीय अहवाल, इतर कागदोपत्री पुरावे ग्राह्य धरून महेश टेंभुर्णे (३२) याला ३० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com