Pune News: निर्दयीपणाचा कळस! केस ओढले, फरफटले.. वृद्ध महिलेला बहिणींकडून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण; आईनेही दिली साथ

Pune Old Lady Beaten: दोन मुलींकडून एका जेष्ठ महिलेला निर्दयीपणे मारहाण करण्यात आल्याचा संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे.
Pune Old Lady Beaten Viral Video
Pune Old Lady Beaten Viral VideoSaamtv

सचिन जाधव, प्रतिनिधी...

Pune Shikrapur Crime News: पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. ही बातमी ताजी असतानाच शिक्रापूर परिसरात एका वृद्ध महिलेला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने सुसंस्कृत पुण्यात नक्की चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Pune Old Lady Beaten Viral Video
Success Story: पुत्र व्हावा ऐसा! पहिल्या प्रयत्नात १०वी नापास... पोळपाट-लाटणे विकून अभ्यास केला; झोपडपट्टीतला मुलगा पोलीस झाला

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दोन मुलींकडून एका जेष्ठ महिलेला निर्दयीपणे मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पुण्यातील शिक्रापूर (Shikrapr) परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओ व्हायरल होताच सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी या प्रकरणात दोन मुलींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) मारहाण करणाऱ्या मुली दोन बहिणी असून त्यांना त्यांची आई देखील यामध्ये साथ देताना दिसत आहे. तर मारहाण झालेली व्यक्ती ही शेजारील जेष्ठ महिला असल्याचे माहिती मिळत आहे.

Pune Old Lady Beaten Viral Video
Loksabha Election 2024 : लोकसभेच्या रणांगणात शाहू महाराज छत्रपती? काेल्हापूरसाठी शरद पवारांची रणनिती

दोन घरांच्या मध्ये बोळात वृद्ध महिलेच्या अंगावर बसून क्रूरपणे मारहाण करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. धक्कादायक म्हणजे या दोन मुलींना त्यांची आईही साथ देत आहे. केस धरुन फरफटत मारहाण केल्याचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी दोन मुली आणि आई विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com