
सचिन बनसोडे, प्रतिनिधी...
Ahmednagar News: परिस्थिती कशीही असली तरी तुमच्याकडे जिद्द असेल तर एक दिवस ध्येय निश्चित गाठता येते. याचेच उत्तम उदाहरण अहमदनगर जिल्ह्यातील केवल कतारी या तरुणाने घालून दिले आहे. झोपडपट्टीत राहाणारा आणि पोळपाट लाटणे बनवून बाजारात विकणारा केवल महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाला आहे. सध्या त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जाणून घेवूया या केवलचा संघर्षमय प्रवास.
झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलाची गगनभरारी...
संगमनेर शहरातील (Ahmednagar) झोपडपट्टीत राहाणारा ३० वर्षीय केवल कतारी. वडील दारासिंग आणि आई मुन्नीबाई कतारी हे लाकडी पोळपाट लाटणे बनवून यात्रा-जत्रा आणि गावोगावच्या बाजारात विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. २००८ साली केवल दहावीत नापास झाला आणि त्याने शिक्षण अर्धवट सोडले.
त्यानंतर त्याने आई वडिलांना कामात मदत करायचे ठरवले आणि स्वतः देखील पोळपाट लाटणे बनवून बाजारात विकू लागला. मात्र मोठ्या भावाने आणि वडिलांनी त्याला प्रोत्साहन दिले आणि सहा वर्ष गॅप घेतल्यानंतर २०१४ ला केवलने पुन्हा दहावीची परीक्षा दिली त्यात ४८ टक्के मिळवून तो उत्तीर्ण झाला.
पोलीस होण्याचे स्वप्न पुर्ण...
त्यानंतर दिवसा पोळपाट लाटणे बनवणे, लग्नात वाढपी म्हणून काम करणे आणि रात्री अभ्यास करणे असा दिनक्रम बनवून त्याने कला शाखेतून १२ वीत ७८ टक्के गुण मिळवले तसेच संगमनेर महाविद्यालयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. मुंबईत ताज हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्र पोलिसांनी बाजवलेल्या कामगिरीबद्दल माहिती असल्याने केवल याला पोलीस दलाचे विशेष आकर्षण होते.
मात्र झोपडपट्टीत राहणारा केवल आणि त्याची आर्थिक परिस्थिती बघून 'तूझे पुढे काहीच होऊ शकत नाही' असे अनेकांनी त्याला हिणवले. केवलने निश्चय केला आणि पोलीस भरतीसाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यानच्या काळात घरच्यांनी केवलचे लग्न लावून दिले मात्र त्याने अभ्यास आणि पोलीस भरतीसाठी प्रयत्न सुरूच ठेवले.
अखेर त्याच्या या कष्टाला फळ आले असून नुकतीच मुंबई पोलीस दलात त्याची निवड झाली. त्याच्या या यशापुढे आई वडिलांना आकाश ठेंगणे झाले. मुलाचे होणारे कौतुक आणि सत्कारसमारंभ पाहून त्याचे गरीब- मायबाप भारावून गेलेत. पुढे पीएसआय (PSI) बनण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील केवलने सांगितले आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.