
प्रमोद जगताप, प्रतिनिधी...
PM Narendra Modi: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो खतांच्या गोण्यांवर छापण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. खतांचा कमीत- कमी वापर करावा असा संदेश या फोटोद्वारे शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. याबाबत खत कंपन्यांना केंद्र सरकारकडून डिझायन पाठवल्याचेही सांगण्यात येत आहे. या निर्णयावरुन राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, केंद्रीय खत विभागाने शुक्रवारी उत्पादकांना पत्र लिहले आहे. यामध्ये नवीन डिझाइन केलेल्या पिशव्या खरेदी आणि वापरण्यासाठी तातडीने योग्य कारवाई करण्यास सांगितले आहे. या पत्राबरोबरच विभागाने सर्व उत्पादकांसोबत नवीन डिझाइन शेअर केले आहे, ज्याला रसायन आणि खते मंत्र्यांनी अंतिम आणि मंजूरी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) या फोटोसोबत रासायनिक खतांचा कमी आणि संतुलित वापर करून पृथ्वी मातेला वाचवण्यासाठी मी शेतकऱ्यांनी मोठे पाऊल उचलण्याचे आवाहन करतो," असा संदेश खतांच्या गोण्यांवर असेल.
काय म्हणाले राजू शेट्टी?
यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे. "रासायनिक खतांच्या गोण्यांवर फोटो छपाईला आमचा विरोध नाही, पण त्यांना त्याचा काही राजकीय फायदा होणार नाही. त्यांना श्रेय घ्यायचं असेल तर 10 वर्षातील रकाना त्यांनी गोणीवर टाकावा म्हणजे त्यांना सगळं समजेल.." असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे, त्यांचा सन्मान सगळ्यांनी करावा पण सगळीकडेच तुमचा फोटो छापवा हा अट्टाहास चुकीचा, असेही ते म्हणाले.
तसेच पुढे बोलताना "पंतप्रधान मोदींची इमेज तळागाळापर्यंत जावी यासाठी हा अट्टाहास असल्याचे म्हणत जर रासायनिक खत वापरायचं नाही असं ठरवलं तर आपल्या देशाची अवस्था श्रीलंकेसारखी होईल, असा धोकाही त्यांनी बोलून दाखवला.
"एकीकडे पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी महामार्गावरचे सगळे फोटो हटवले आणि हे पंतप्रधान स्वतःचे फोटो खतांच्या पोत्यावर छापत आहेत, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांवर अंथरलेल्या कापडावर पण तुमचा फोटो छापा, हा तुमचा अट्टाहास.. अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.