Chandrashekhar Bawankule: 'सामना' रंगला! "उद्धव ठाकरे अहंकाराच्या नशेत..."; अग्रलेखातील टीकेनंतर भाजपनं सोडला टीकेचा बाण

Chandrashekhar Bawankule On Saamana Editorial: वृत्तपत्रांना दिलेल्या स्वातंत्र्याच्या बाहेर जाऊन असे करणे गैर आहे, असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं.
Chandrashekhar Bawankule Vs Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule Vs Uddhav ThackeraySaam TV
Published On

Maharashtra Political News: सामना अग्रलेखातून आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर खरमरीत टीकास्त्र सोडण्यात आलं. त्यावरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सामना विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. (Latest Marathi News)

सुंभ जळाला तरी पिळ कायम

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरील टीकेला प्रत्युत्तर देत बावनकुळेंनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर पोस्ट शेअर केलीये. यात त्यांनी लिहिलंय की, "उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराची सत्ता उलथून देवेंद्रजी पुन्हा एकदा सत्तेत आले. हे सत्य त्यांना अजूनही पचत नाही म्हणून आजही ते ग्लानीत आहेत. ‘सुंभ जळाला तरी पिळ कायम’ या म्हणीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचा पिळ कायम आहे. म्हणूनच अहंकाराच्या नशेत झिंगून ते देवेंद्रजींवर टीका करत आहेत.", अशी घणाघाती टीका बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

Chandrashekhar Bawankule Vs Uddhav Thackeray
Maharashtra Political News: महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता; सोलापुरात लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच

उद्धव ठाकरे खरे गद्दार ...

पुढे ठाकरे गटाच्या सेनेचा त्यांनी किंचीत सेना असा उल्लेख केला. "किंचित सेनेचे पक्षप्रमुख आणि वैफल्यग्रस्त उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून बोरूबहाद्दर संजय राऊत यांनी आज सामनातून देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात गरळ ओकली आहे. २०१९ साली ज्यांनी भाजपसोबत गद्दारी केली, स्वतःच्या खुर्चीसाठी वडिलांच्या हिंदुत्ववादी धोरणाला पायदळी तुडवलं. ते उद्धव ठाकरे खरे गद्दार आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेनं ओळखलंय.", अशी आगपाखड चंद्रशेखर बावनकुळेंनी केलीये.

"पण तुमचा हा जळफळाट फार काळ राहणार नाही. कारण येणाऱ्या निवडणकीत जनता तुमच्या उरल्या सुरल्या अहंकाराची लंका जाळून टाकेल. तोवर जनतेच्या पैशातून बांधलेल्या मातोश्री-२ मध्ये तुम्ही आणि बोरूबहाद्दर राऊत टोमणे मारत बसा, अशा शब्दांत संजय राऊतांना टोला लगावलाय.

Chandrashekhar Bawankule Vs Uddhav Thackeray
Maharashtra Politics: शिंदे गटाचे १२ आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात? भेट घेण्यासाठी मातोश्रीवर फोन केला पण...

सामना विरुद्ध तक्रार दाखल करणार

सामना वृत्तापत्राविरुद्ध आम्ही तक्रार दाखल करणार. तसेच कार्यकर्ते याबाबत आंदोलन करणार आहेत. सामनातून ते जी आग ओकत आहे ती थांबवावी लागेल. वृत्तपत्रांना दिलेल्या स्वातंत्र्याच्या बाहेर जाऊन असे करणे गैर आहे, असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com