Solapur News: आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी जोमाने कामाला लागली आहे. मात्र सोलापूरात महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता दिसत आहे. राष्ट्रावादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांमध्ये सोलापूर लोकसभेच्या जागेवरून मतभेद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)
सोलापूर लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून दोन दिवसांपूर्वी पक्ष निरीक्षकांसमोर आढावा बैठकीत काँग्रेसने एकमुखी प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीची मागणी केली होती. मात्र आता आपल्याला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी लोकसभेसाठी तयारी करायला सांगितल्याचा गौप्यस्पोट काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते सुधीर खरटमल यांनी केला आहे.
महाराष्ट्रात भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी राज्यभर तयारी करत असताना सोलापूर लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सोलापूर लोकसभेच्या जागेवरून आमने-सामने येतात का ते पाहण्याची उत्सुकता आहे.
त्याचबरोबर सोलापूरमधील माढा लोकसभा मतदारसंघावर देखील काँग्रेसने दावा केला आहे. जागावाटपामध्ये माढा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आली आहे. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे याच मतदारसंघातून निवडून आले होते. पुढे 2014 च्या मोदी लाटेत ही विजयसिंह मोहिते पाटलांनी माढ्याची राष्ट्रवादीची जागा राखली होती. मात्र 2019 मध्ये मोहिते-पाटील घराणं भाजपवासी झाल्यामुळे राष्ट्रवादीने हक्काची जागा गमावली आणि रणजितसिंह नाईक-निंबाळकर खासदार झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.