Pune Fraud News: धक्कादायक! साखर निर्यात करण्याच्या बहाण्याने फसवणूक; व्यावसायिकाला घातला १.५ कोटींचा गंडा

Pune Latest News: साखर निर्यातीसाठी १० टक्के अ‍ॅडव्हान्स घेऊन साखर निर्यात न करता १० दीड कोटींची फसवणूक झाली आहे..
Pune Khadak Police
Pune Khadak Police Saamtv
Published On: 

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Fraud News: पुणे शहरात फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या शहरातील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साखर निर्यातीच्या बहाण्याने व्यावसायिकाची तब्बल १.५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणी हसन अली पुरोहित यांनी खडक पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार डॉ. उमेश कृष्ण जोशी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार मार्च २०२१ पासून सुरू असल्याचे समोर आले आहे.. (Pune Latest News)

Pune Khadak Police
Nanded News: खुल्या प्रवर्गातून विजयी; तरीही जात वैधता प्रमाणपत्र न दिल्याच्या कारणावरून केले अपात्र

काय आहे संपूर्ण प्रकरण...

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डॉ. उमेश जोशी यांची ओरा एंटरप्रायजेस नावाची पुण्यात एक कंपनी आहे. त्यांना आपली ५१८४ टन साखर दुबईला निर्यात करायची होती. त्यासाठी कृष्णा जोशी याने त्यांना १० टक्के अ‍ॅडव्हान्स मागितले. कृष्णा जोशीच्या मागणीनुसार पुरोहित यांनी त्याला यांनी १ लाख ८६ हजार ६२४ डॉलर म्हणजेच १ कोटी ३८ लाख ८४ हजार ८२६ रुपये) ऑनलाईन पद्धतीने जमा केले. (Latest Marathi News)

मात्र जोशीने साखर निर्यात करतो, असे सांगून वेळेवर साखर पुरवली नाही. तसेच साखरेच्या वाहतूकीसाठी ट्रान्सपोर्ट कंपनीला पैसे दिले होते. निर्यातीसाठी त्यांनी कंटनेर ही बुक केले होते. साखर न पुरविल्याने त्यांना या सगळ्या ऑर्डर रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे त्यांना दंड करण्यात आला. (Pune News)

Pune Khadak Police
Kolhapur Crime News: धक्कादायक! भरचौकात तरुणावर तलवारीने सपासप वार; कोल्हापूरात खळबळ

दरम्यान, साखर निर्यात न करता फिर्यादीने दिलेले अ‍ॅडव्हान्स रक्कम तसेच कंटेनर बुंकिग अशी एकूण १ कोटी ५७ लाख ३० हजार २३० रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. ज्यानंतर तक्रारदार हसन अली पुरोहित यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली. आता खडक पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Pune Latest Fraud News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com