Pune News
Pune NewsSaam TV

Pune News : फटाक्यांमुळे लागली आग; थ्री बीएचके फ्लॅट जळून खाक

फटाक्यांमुळे लागलेल्या आगीमध्ये थ्री बीएचके फ्लॅटचा जळून अक्षरश: कोळसा झाला आहे.
Published on

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

पुणे : देशभरात दिवाळीची (Diwali) धामधुम सुरु आहे. दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली जाते. मात्र, कधी आपल्या निष्काळजीपणामुळे किंवा अपघाताने फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या घटना घडतात. (Pune News)

अशीच एक घटना समोर आली असून फटाक्यांमुळे लागलेल्या आगीमध्ये थ्री बीएचके फ्लॅटचा जळून अक्षरश: कोळसा झाला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत घरमालकाचे मोठं नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही आगीची घटना औंध येथे घडली असून फटाक्यामुळे पहिल्या मजल्यावर आग लागली आणि या आगीमध्ये संपुर्ण थ्री बीएचके फ्लॅट जळून खाक झाला आहे.

Pune News
Maharashtra Rail Update : 'त्या' अपघातानंतर मुंबई, पुणे - नागपूर रेल्वे सेवा सुरळीत सुरु

दरम्यान, आज सकाळी मुंबईतील साकीनाका येथील खैरानी रोड, मस्जिद गल्ली परिसरातील एक कचरा गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र ही आग देखील दिवाळी दिवशी लागली आहे. शिवाय गोदामात प्लास्टीकचा कचरा मोठ्या प्रमाणात भरलेला असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली असून अजूनही या भागात धुराचे लोट पसरले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com