Pune News: पुण्यात आढळल्या अनधिकृत शाळा; शिक्षण विभागाने पालकांना केलं महत्वाचं आवाहन

Pune News: पुण्यातील शिक्षण विभागातून महत्वाची बातमी हाती आली आहे. पुण्याच्या हवेली तालुक्यात १५ शाळा अनधिकृत आढळल्या आहेत
school
schoolSaam tv

Pune News:

पुण्यातील शिक्षण विभागातून महत्वाची बातमी हाती आली आहे. पुण्याच्या हवेली तालुक्यात १५ शाळा अनधिकृत आढळल्या आहेत. शिक्षण विभागाने या अनधिकृत शाळेची यादी जाहीर केली आहे. तसेच पालकांनी या शाळेत प्रवेश घेऊ नये, असे आवाहनही शिक्षण विभागाने केले आहे. (Latest Marathi News)

पुण्यात शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षण विभागाची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, पुण्यातील हवेली तालुक्यात तब्बल १५ संस्थानी परवानगी न घेताच शाळा सुरु केल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या शाळा तपासणीत हा प्रकार उघडकीस आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

school
Ajit Pawar Health: जनतेपासून दूर रहावे लागणे त्रासदायक; अजित पवार पुन्हा एकदा विश्रांती घेणार

पुणे जिल्हयात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांची तपासणी केली. त्यानंतर हवेली तालुक्यात १५ शाळा अनधिकृत आढळल्या. या अनधिकृत शाळेत जवळपास ३७७ विद्यार्थी शिकतात. शिक्षण विभागाने या शाळांची यादी जाहीर केली आहे. तसेच पालकांनी या शाळेत मुलांचं अॅडमिशन करू नये, असे आवाहनही शिक्षण विभागाने केलं आहे.

तत्पूर्वी, शाळा तपासणी अहवालात तपासणी अधिकाऱ्यांनी अभिप्रायात म्हटलं की, एका एफएम चॅनलवर शाळेची जाहिरात वारंवार दाखवण्यात येत होती. त्यानंतर या शाळेला भेट दिली. शाळेत जाऊन या शाळेची तपासणी केली. त्यावेळी शाळेच्या मॅनेजरनने शाळेची मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे उत्तर दिले.

school
Pune Crime News: पुण्यात ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रसिद्ध सराफावर गोळीबार, घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये पसरली घबराट

'त्यानंतर शाळेच्या मुख्यधापकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र,त्यांनी भेट दिली नाही. तरीही शाळेची जाहिरात सुरु होती. त्यानंतर ही शाळा अनधिकृतरित्या सुरु असल्याचे तपासणीत उघड झाले, असे ते पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com