सचिन जाधव, प्रतिनिधी
पुण्याच्या पालकमंत्रीपदीपद स्विकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. आजही (शुक्रवार,२० ऑक्टोंबर) अजित पवार हे पुणै दौऱ्यावर असून पाण्याच्या महत्वपूर्ण विषयावर बैठक आयोजित केली होती. मात्र पालकमंत्र्यांच्या या महत्वाच्या बैठकीला शहरातील भाजप आमदारांनी दांडी मारल्याने चर्चांना उधाण आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे त्यांच्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे ओळखले जातात. आजच्या पुणे (Pune) दौऱ्यातही याचाच प्रत्यय आला. शहरातील पाणी प्रश्नावर अजित पवार यांनी बैठक घेतली. सकाळी सात वाजताच या बैठकीला सुरूवात झाली. मात्र शहरातील महत्वाच्या प्रश्नांवरील बैठकीकडे भाजप आमदारांनी मात्र पाठ फिरवल्याचे दिसून आले.
या बैठकीला भाजपचा फक्त एकच आमदार उपस्थित होता. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर हे अजित पवारांच्या बैठकीला उपस्थित राहिले. भाजपच्या पाच आमदारांपैकी फक्त एकच आमदार या बैठकीला उपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. (Maharashtra Politics)
पालकमंत्री बदलीने नाराजी?
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याजागी अजित पवार यांची पुण्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाली. या अजित पवार यांच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रही होते, मात्र भाजप कार्यकर्त्यांचा यास विरोध होता.
अजित पवार यांना पालकमंत्रीपद दिल्यानंतर काही नेत्यांनी ही नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली होती. अशातच पालकमंत्र्यांनी बोलावलेल्या महत्वाच्या बैठकीलाच दांडी मारल्याने भाजप नेते नाराज असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा जोर धरु लागल्या आहेत. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.