खेळता-खेळता लिफ्टमध्ये गेला अन् दोन मजल्यांमध्ये अडकला; ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

7-Year-Old Child Dies in Lift : पुण्यातील सिंहगड रोडवरील रिद्धी-सिद्धी अपार्टमेंटमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. खेळत असताना लिफ्टमध्ये अडकून मुलाचा मृत्यू झाला आहे.
7-Year-Old Child Dies in Lift :
Pune Shocked After Minor Boy Dies in Apartment Lift Incidentsaam tv
Published On

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात हृदयद्रावक घटना घडली आहे.निम्बजनगरमधील रिद्धी सिद्धी अपार्टमेंटमध्ये खेळत असताना लिफ्टमध्ये अडकल्याने ७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. शिवांश शैलेश धूत असं या मुलाचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.

7-Year-Old Child Dies in Lift :
भयंकर! नाशिकमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर लिफ्ट कोसळली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवांश खेळत असताना लिफ्टमध्ये गेला. त्यावेळी त्याने लिफ्टचे बटणं दाबलं, त्यानंतर लिफ्ट सुरू झाली. मात्र, दुसरा मजला येण्यापूर्वीच लिफ्ट अचानक बंद पडली आणि शिवांश लिफ्टमध्ये अडकला. बराच वेळ गेल्यानंतर रहिवाशांच्या ही बाब लक्षात आली, त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण केलं.

7-Year-Old Child Dies in Lift :
Pune: सातव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, तरुणाचा जागीच मृत्यू, चेअरमनसह ११ जणांवर गुन्हा

त्यांनी शिवांशला बाहेर काढलं, परंतु तोपर्यंत उशिर झाला होता. प्राथमिक तपासात लिफ्टमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड आढळून आलेला नसल्याचे सांगितले जातंय. लिफ्टची देखभाल सोसायटीमार्फत केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या घटनेमुळे पुण्यातील बहुमजली सोसायट्यांमधील लिफ्टच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिवांश बराच वेळ घरी न आल्याने आणि सोसायटीत न दिसल्याने कुटुंबियांनी त्याची शोधाशोध सुरू केली. काही वेळानंतर लिफ्ट बंद असल्याचे लक्षात आले. त्यात शिवांश असावा असा संशय रहिवाशांना आला. त्यांनी तात्काळ सिंहगड रस्ता पोलीस आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून लिफ्टचे दार तोडून शिवांशला बाहेर काढले.

मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. लिफ्टमध्ये हवा खेळती न राहिल्याने आणि घाबरल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.या घटनेने धूत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने सोसायट्यांमधील लिफ्टच्या देखभालीचा प्रश्न गंभीर बनल्याची बाब समोर आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com