Pune News: २४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरची आत्महत्या, कंपनीमध्ये लॅपटॉपच्या चार्जरने घेतला गळफास

Engineer Ends Life In Pimpari Chinchwad: पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअरने आत्महत्या केली. कंपनीच्या टॉयलेटमध्ये गळफास घेत त्याने आयुष्य संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आईला मेसेज केला होता.
Pune News: २४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरची आत्महत्या, कंपनीमध्ये लॅपटॉपच्या चार्जरने घेतला गळफास
Engineer Ends Life In Pimpari ChinchwadSaam Tv
Published On

Summary -

  • हिंजवडी आयटी पार्कमध्ये २४ वर्षीय इंजिनीअरची आत्महत्या

  • कंपनीच्या टॉयलेटमध्ये लॅपटॉप चार्जरने घेतला गळफास

  • आत्महत्येपूर्वी आईला मोबाईलवरून मेसेज केला होता

  • बेटिंगमध्ये नुकसान झाल्यामुळे उचलले टोकाचे पाऊल

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या इंजिनीअरने कंपनीमधील टॉयलेटमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी या इंजिनीअरने आईला मोबाइलवरून मेसेज केला होता. या घटनेमुळे टीसीएस कंपनीत खळबळ उडाली. हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाचा मृतेदह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी आईटी पार्कमधील टीसीएस कंपनीत ही धक्कादायक घटना घडली. सुजल विनोद ओसवाल ( २४ वर्षे) या सॉफ्टवेअर इंजिनीअरने आत्महत्या केली. तो पुण्यातील वानवडी परिसरामध्ये राहायला होता. हिंजवडीतील टीसीएस कंपनीमध्ये तो कामाला होता. कंपनीच्या टॉयलेटमध्ये जाऊन लॅपटॉपच्या चार्जिंग वयारने गळफास घेत त्याने आत्महत्या केली.

Pune News: २४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरची आत्महत्या, कंपनीमध्ये लॅपटॉपच्या चार्जरने घेतला गळफास
MHADA Engineer : म्हाडाचा अभियंता जाळ्यात अडकला, लाच घेताना ACB ने रंगेहात पकडला

सुजल विनोद ओसवालने बेटिंगमध्ये मोठं नुकसान झाल्याच्या कारणावरून आत्महत्या केल्याचे पोलिस तपासातून उघड झाले. त्याने आईला जीवाचे बरे वाईट करून घेतो असा मेसेज करून आत्महत्या केली. त्याने आत्महत्या केल्यामुळे कंपनीत एकच खळबळ उडाली. कंपनीने हिंजवडी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुजलचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला.

Pune News: २४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरची आत्महत्या, कंपनीमध्ये लॅपटॉपच्या चार्जरने घेतला गळफास
Engineer Death : फ्लॅट पाहण्यासाठी गेला अन् ३१ व्या मजल्यावरुन पडला, इंजिनिअरची आत्महत्या, अपघात की घातपात?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com