Pune News: शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण, पुण्यातील शाळेतील धक्कादायक प्रकार; VIDEO पाहून पुणेकर संतप्त

Pune School Student Beaten: विद्यार्थ्याला मारहाण प्रकरणी शिक्षिकेविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याचे पालक आक्रमक झाले आहेत. त्यांनी या शिक्षिकेविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Pune Student Beaten By Teacher
Pune Student Beaten By TeacherSaam Tv

सागर आव्हाड, पुणे

Pune Student Beaten By Teacher:

पुण्यामध्ये एका शाळेच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विद्यार्थ्याला केलेल्या मारहाण प्रकरणी शिक्षिकेविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याचे पालक आक्रमक झाले आहेत. त्यांनी या शिक्षिकेविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या बाजीराव रोडवरील अप्पा बळवंत चौकातील नू.म.वी शाळेमध्ये ही धक्कदायक घटना घडली आहे. ९ वीमध्ये शिकणारा विद्यार्थी वर्गामध्ये दंगा करत बसला होता. हे पाहून शिक्षिका संतापली आणि तिने वर्गामध्येच सर्व विद्यार्थ्यांसमोर या विद्यार्थ्याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ वर्गातील विद्यार्थ्यांनीच आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून पुणेकरांनी संताप व्यक्त केला आहे.

Pune Student Beaten By Teacher
Mumbai Crime News: अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू, एलफिन्स्टन ब्रिजवरील घटना

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, खाकी पँट आणि पांढऱ्या शर्टमध्ये विद्यार्थी जमिनीवर बसलेला दिसत आहे. या विद्यार्थ्याला जाब विचारत शिक्षिका त्याला लाथाबुक्याने मारहाण करत आहे. 'आहो टीचर सोडाना आता', असे बोलत हा विद्यार्थी शिक्षिकेकडे विनंती करत आहे. तरी देखील शिक्षिका त्याचा हात परगळून त्याच्या तोंडावर फटके मारताना दिसत आहे. वर्गामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडीओ कैद केल्यामुळे हा सर्व प्रकार समोर आला.

Pune Student Beaten By Teacher
Gold Smuggling in Mumbai: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ४.६९ कोटी रुपयांचं सोनं जप्त; अंतरवस्त्रात लपवून सुरू होती तस्करी

हा व्हिडीओ विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी थेट विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल करत कारवाई करण्याची मागणी केली. पूजा केदारी असं या शिक्षिकेचे नाव आहे. त्यांनी विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्याचा प्रकार गंभीर असून संस्थेने त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. यापूर्वी देखील या शिक्षिकेने बऱ्याच मुलांना अशाच प्रकारे बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

Pune Student Beaten By Teacher
Kolhapur Crime News : कुप्रसिद्ध टाेळीच्या म्हाेरक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातून 12 गुन्हेगार हद्दपार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com