Gold Smuggling in Mumbai: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ४.६९ कोटी रुपयांचं सोनं जप्त; अंतरवस्त्रात लपवून सुरू होती तस्करी

Gold Smuggling at Mumbai Airport: सोन्याचं मेण, रोडियम प्लेटेड वायर आणि बक्कल तसेच वॉशरच्या आकाराच्या रिंग यांच्या स्वरूपात या रॅकेटकडून सोन्याची तस्करी सुरू होती.
8 Kg Gold Worth Rs 4.69 Crore Seized From Chhatrapati Shivaji Maharaj International Airport
8 Kg Gold Worth Rs 4.69 Crore Seized From Chhatrapati Shivaji Maharaj International AirportSaam TV

सचिन गाड

Chhatrapati Shivaji Maharaj International Airport :

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विचित्र पद्धतीने सोन्याची तस्करी सुरू असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेता परदाफाश झाला असून ४.६९ कोटी रुपयांचं तब्बल ८ किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे.

8 Kg Gold Worth Rs 4.69 Crore Seized From Chhatrapati Shivaji Maharaj International Airport
Police Recruitment : मराठा आरक्षणासाठी पोलीस भरतीच्या नोंदणीला मुदत वाढ; १५ एप्रिलपर्यंत करता येतील अर्ज

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, या प्रकरणी दोन परदेशी नागरिकांसह एकूण ११ जणांना अटक करण्यात आली आहे. अंतरवस्त्रात लपवून, गुदद्वारात लपवून तसेच केसांच्या क्लिपला सोन्याच्या पट्ट्या चिटकवून सोन्याची तस्करी केली जात होती.

पोलिसांनी तपासणी केल्यावर या व्यक्तींकडून तब्बल ४.६९ कोटी रुपयांचं सोनं जप्त केलं आहे. कस्टम्स विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. सोन्याचं मेण, रोडियम प्लेटेड वायर आणि बक्कल तसेच वॉशरच्या आकाराच्या रिंग यांच्या स्वरूपात या रॅकेटकडून सोन्याची तस्करी सुरू होती.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) अशा घटना सातत्याने समोर येत आहेत. सोमवारी देखील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ३.५२ कोटी रुपयांच सोन जप्त करण्यात आलं. कस्टम्स विभागाने ही कारवाई केली होती.

या घटनेमध्ये शरीरात तसेच कपड्यात आणि चेक-इन बॅगेतून सोन्याची तस्करी केली जात होती. वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण ६.११ किलो सोन जप्त करण्यात आलं आहे. सोन्यासह २०००० डॉलर्स आणि मोबाईल देखील जप्त करण्यात आलेत.

8 Kg Gold Worth Rs 4.69 Crore Seized From Chhatrapati Shivaji Maharaj International Airport
Mumbai Crime News: अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू, एलफिन्स्टन ब्रिजवरील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com