Pune : महिला आणि मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेत पुण्याचा क्रमांक पाचवा; अहवालात धक्कादायक माहिती समोर

Pune Crime Cases: NCRB च्या २०२४ अहवालानुसार महिला आणि मुलांविरोधातील लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यांत पुणे शहर देशात पाचव्या क्रमांकावर. पुण्यात २४४ गुन्ह्यांची नोंद झाली असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
PUNE RANKED FIFTH IN INDIA FOR CRIMES AGAINST WOMEN AND CHILDREN NCRB 2024 REPORT
PUNE RANKED FIFTH IN INDIA FOR CRIMES AGAINST WOMEN AND CHILDREN NCRB 2024 REPORTSaam Tv
Published On
Summary
  • NCRB च्या २०२४ अहवालात पुणे महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांत देशात पाचव्या क्रमांकावर

  • पुण्यात महिला आणि मुलांविरोधातील लैंगिक अत्याचाराचे २४४ गुन्हे नोंद

  • दिल्ली, जयपूर, मुंबई आणि हैदराबादनंतर पुण्याचा क्रमांक

  • महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

  • सामाजिक मानसिकता बदलण्याची गरज

शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हगारी प्रवृत्तीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. खून, अत्याचार, बलात्कार, छळ या घटनांनी पुणे शहर गेल्या काही महिन्यांमध्ये हादरून गेलं आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो (NCRB) च्या २०२४ च्या अहवालानुसार, महिला आणि मुलांविषयक लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत पुणे शहर देशात पाचव्या क्रमांकावर पोहोचले आहे. या आकडेवारीमुळे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अहवालानुसार, २०२४ या वर्षात पुण्यात महिला आणि मुलांविषयक लैंगिक अत्याचाराचे तब्बल २४४ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. देशातील १९ प्रमुख महानगरांच्या तुलनेत ही संख्या चिंताजनक मानली जात आहे. दिल्ली, जयपूर, मुंबई आणि हैदराबाद या शहरांनंतर पुण्याचा क्रमांक लागतो. महानगरनिहाय आकडेवारी पाहिली असता, दिल्ली शहरात सर्वाधिक १,०८९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यानंतर जयपूरमध्ये ४९७, मुंबईत ४११, हैदराबादमध्ये ३५८ तर पुण्यात २४४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. देशातील १९ महानगरांमध्ये महिला अत्याचाराच्या एकूण ५० हजार ५८४ घटना नोंदवण्यात आल्याची माहितीही अहवालात देण्यात आली आहे.

PUNE RANKED FIFTH IN INDIA FOR CRIMES AGAINST WOMEN AND CHILDREN NCRB 2024 REPORT
Pune : प्रेयसीचे लग्न दुसऱ्याशी ठरल्याने प्रियकराचा रक्तरंजित हल्ला; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटनांनी या वाढत्या गुन्ह्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. शहराचा वाढता विस्तार, सोशल मीडियाचा गैरवापर, महिलांविरोधातील मानसिकता आणि कायद्याची भीती कमी होत असल्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

PUNE RANKED FIFTH IN INDIA FOR CRIMES AGAINST WOMEN AND CHILDREN NCRB 2024 REPORT
Shocking : नातीला पोटमाळ्यावर लपवलं, लैंगिक अत्याचार करताना लोकांनी पाहिलं, नराधम आजोबाला पोलिसात दिलं, पर्वती भागातील घटनेत काय घडलं?

दरम्यान, पुणे पोलिसांकडून महिला सुरक्षेसाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे. महिला हेल्पलाइन, पेट्रोलिंग, सायबर मॉनिटरिंग आणि जनजागृती मोहिमा सुरू असल्या तरी गुन्ह्यांची वाढती संख्या प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे. महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी केवळ कायदे कठोर करून चालणार नाही, तर समाजातील मानसिकता बदलणे आणि जनजागृती वाढवणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com