स्वातंत्र्यदिनी पुण्यात पाणी नाही, शहरातील 'या' भागात पाणीपुरवठा बंद; नेमकं कारण काय?

Water Supply Halt in Multiple Pune Localities: पुण्यात नगर रस्ता परिसरात आज पाणीपुरवठा बंद. भामा-आसखेड जलकेंद्र तातडीच्या दुरुस्तीसाठी बंद. सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत पाणीपुरवठा खंडित.
Water Supply Halt in Multiple Pune Localities
Water Supply Halt in Multiple Pune LocalitiesSaam Tv News
Published On
Summary
  • पुण्यात नगर रस्ता परिसरात आज पाणीपुरवठा बंद

  • भामा-आसखेड जलकेंद्र तातडीच्या दुरुस्तीसाठी बंद

  • सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत पाणीपुरवठा खंडित

  • PMC कडून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था

सचिन जाधव, साम टिव्ही

पुण्यात आज काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद असणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रात सुट्टी असल्याने महापारेषणकडून २२० केव्ही क्षमतेच्या वीजवाहिन्यांच्या तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे भामा-आसखेड जलकेंद्र आज बंद राहणार असून, नगर रस्ता परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे थांबणार आहे.

महापारेषणकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाकण आणि तळेगाव परिसरातील औद्योगिक कंपन्यांना आज स्वातंत्र्यदिनाची सुट्टी आहे. त्यामुळे महापारेषणकडून या भागातील २२० केव्ही क्षमतेच्या वाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे काम केले जाणार आहे. या कारणास्तव शहरातील तब्बल दहा लाख पुणेकरांना पाणीपुरवठा करणारे भामा- आसखेड जलकेंद्र बंद असणार आहे. परिणामी आज संपूर्ण नगर रस्ता परिसरात पाणी बंद असणार आहे.

Water Supply Halt in Multiple Pune Localities
PM Narendra Modi: दिवाळीत सर्वसामान्यांना मिळणार बंपर गिफ्ट; कराबाबत पीएम मोदींची मोठी घोषणा

भामा-आसखेड जॅकवेल व कुरुळी जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद असेल. त्यामुळे लोहगाव, कळस, धानोरी, टिंगरेनगर, विमाननगर, वडगावशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, खराडी, आळंदी नगर परिषद व परिसरातील नागरिकांना पाण्याचा त्रास होणार आहे.

Water Supply Halt in Multiple Pune Localities
Sara Tendulkar: अर्जुननंतर सारा तेंडुलकरनं दिली खुशखबर; खास कार्यक्रमातले फोटो व्हायरल

अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे महापालिकेची चांगलीच कोंडी झाली असून, प्रशासनाने तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे. शहरातील इतर जलशुद्धीकरण केंद्रांमधून मागणीनुसार पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com