PM Narendra Modi: दिवाळीत सर्वसामान्यांना मिळणार बंपर गिफ्ट; कराबाबत पीएम मोदींची मोठी घोषणा

PM Modi addressing the nation: पंतप्रधान मोदींची दिवाळीसाठी नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा जाहीर.
PM Modi addressing the nation
PM Modi addressing the nationSaam Tv News
Published On
Summary
  • पंतप्रधान मोदींची दिवाळीसाठी नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा जाहीर.

  • स्वस्त दैनंदिन वस्तूंची हमी.

  • १ लाख कोटींची विकसित भारत रोजगार योजना सुरू.

  • ऑपरेशन सिंदूरमधून आत्मनिर्भर भारताची ताकद अधोरेखित.

आज १५ ऑगस्ट. भारत आज ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवर सलग १२व्यांदा तिरंगा फडकवून देशवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरपासून योजनांपर्यंत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी भारतीयांना दिवाळीला मोठं गिफ्ट मिळणार असल्याची घोषणा केली. यातून सामान्यांना नक्कीच दिलासा मिळणार असल्याचं मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'दिवळीत देशवासियांना खूप मोठं गिफ्ट मिळणार आहे. यासाठी आम्ही एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. आम्ही नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म घेऊन येणार आहोत. दिवाळीत सामान्यांसाठी नक्कीच भेट ठरेल. सामान्य माणसाचे कर मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच दैनंदिन वस्तू देखील स्वस्त होतील. यामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल', असं मोदी म्हणाले.

PM Modi addressing the nation
मुंबईत मराठी - गुजराती वाद, परप्रांतियाकडून मराठी तरूणाला मारहाण; VIDEO व्हायरल

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेची घोषणा केली. ही योजना एक लाख कोटी रूपयांची आहे. याद्वारे खासगी क्षेत्रात रोजगार मिळवणाऱ्यांना १५ हजार रूपयांची प्रोत्साहन रक्कम दिली जाईल. या योजनेद्वारे तरूणांना रोजगार मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

PM Modi addressing the nation
सोनं - चांदीच्या दरात वाढ की घट? २४ कॅरेटसाठी किती पैसे मोजावे लागणार?

भारतानं आत्मनिर्भर होणं गरजेचं

पंतप्रधान मोदींनी भाषणावेळी भारतानं आत्मनिर्भर होणं गरजेचं असल्याचं सांगितलं. 'भारतानं आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे. ऑपरेशन सिंदूर या मोहिमेवेळी ते दिसून आलं. आपल्याकडे कोणकोणती शस्त्रे होती, हे पाकिस्तानला काही कळले नाही. जर भारत आत्मनिर्भर नसता तर, ऑपरेशन सिंदूरचं यश बघायला मिळालं नसतं', असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com