Bhagwan Pawar Letter : नियमबाह्य कामे करायला नकार दिल्यामुळं माझं निलंबन; आरोग्य अधिकाऱ्याचं CM शिंदेंना खळबळजनक पत्र

Bhagwan Pawar Letter To CM Eknath Shinde: पुणे महापालिकेचे निलंबित आरोग्य अधिकारी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी एका मंत्री महोदयांवर खळबळजनक आरोप केले आहेत.
आरोग्य अधिकाऱ्याचं मुख्यमंत्र्यांना  पत्र
Bhagwan Pawar Letter To CM Eknath ShindeSaam Tv
Published On

पुणे महापालिकेचे निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या पत्रात नक्की आहे तरी काय? मंत्री महोदयांनी कात्रजच्या कार्यालयात मला बोलावलं. नियमबाह्य टेंडरची काम करण्यासाठी दबाव आणल्याचा दावा त्यांनी या पत्रामध्ये केला आहे. नियमबाह्य काम केले नाही म्हणून निलंबन केल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.

निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी नाव न घेता आरोग्यमंत्र्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी देखील ठाकरे गटाने अनेकदा आरोग्य मंत्र्यांविरोधात आरोप केले होते. परंतु आता स्वत: निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र (Bhagwan Pawar Letter To CM Eknath Shinde) लिहिलं आहे. आता याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दखल घेणार का, संबंधित मंत्र्यांवर कारवाई करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

नियमबाह्य काम केली नाहीत म्हणून माझं निलंबन करण्यात आलं आहे, असं भगवान पवार यांनी पत्रात म्हटलंय. आरोग्यमंत्र्यांची नियमबाह्य काम करण्यात दबाव आणल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केवळ मागासवर्गीय अधिकारी म्हणून हेतुपुरस्परपणे त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मॅटमध्ये दावा दाखल केला, हा आकस मनात ठेवून त्यांनी मानसिक छळ केला असंही भगवान पवार पत्रात (Eknath Shinde) म्हटलं आहेत.

आरोग्य अधिकाऱ्याचं मुख्यमंत्र्यांना  पत्र
Eknath Shinde: श्रीकांत शिंदे हॅट्रिक करणार, रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होणार; मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास

आता निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार (Bhagwan Pawar Letter) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रामुळे पुन्हा मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. एका मंत्र्यांकडून नियमबाह्य कामांसाठी दबाब टाकला गेला असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. राजकीय वर्तुळात या पत्राची चांगलीच चर्चा सुरू आहे. आता या पत्रानंतर भगवान पवार यांनी आरोप केलेले मंत्री कोण? अशी चर्चा समोर येत आहे. या पत्रातून त्यांनी निलंबन (Pune Municipal Corporation) मागे घेण्याची विनंती देखील केलेली आहे.

आरोग्य अधिकाऱ्याचं मुख्यमंत्र्यांना  पत्र
CM Eknath Shinde : लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटक सरकार कोसळणार? CM एकनाथ शिंदेंनी दिले मोठे संकेत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com