IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

Pune Municipal Corporation Deputy Commissioners Transfers: मागील फेरबदलानंतर अवघ्या दोन आठवड्यांनी पुणे महानगरपालिकेने पुन्हा एकदा उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आयुक्त नवल किशोर राम यांनी बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.
Pune Municipal Corporation  Commissioners Transfers:
PMC Commissioner Naval Kishor Ram orders another round of deputy commissioner transfers, creating unrest among officials.saam tv
Published On
Summary
  • पुणे महापालिकेत पुन्हा एकदा उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

  • अविनाश सकपाळ यांची १२ दिवसांत दोन वेळा बदली झालीय.

  • वारंवार बदल्यांमुळे अधिकारी अस्वस्थ झालेत.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा धुरळा उडालाय. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांत्तर होत आहेत. नेत्यांच्या पक्ष बदलांनी वातावरण तापलंय. त्याचवेळी पुणे महापालिका बदल्यामुळे चर्चा आलीय. पुणे महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या पुन्हा एकदा बदल्या झाल्या आहेत. दोन आठवड्यापूर्वीच उपायुक्तांच्या बदल्या झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आयुक्त नवल किशोर राम यांनी बदल्याचे आदेश दिलेत.

Pune Municipal Corporation  Commissioners Transfers:
ऐन निवडणुकीत IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या कोणत्या अधिकाऱ्याची कुठे झाली बदली?

उपायुक्त अविनाश सकपाळ यांची १२ दिवसात दोन वेळा बदली झाली आहे. त्यांच्याकडे आता मोटर वाहन विभागाऐवजी घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी देण्यात आलीय. तर संदीप कदम यांच्याकडे मोटारवाहन विभाग देण्यात आलाय. घनकचरा व्यवस्थापन विभाग मिळावा म्हणून पाण्यात देव बुडवून बसलेल्यांना आयुक्तांनी झटका दिला आहे.

Pune Municipal Corporation  Commissioners Transfers:
IAS Transfers: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या प्रशासनात उलथापालथ; जिल्हाधिकाऱ्यांची बदली, दोन IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते प्रशासनामध्ये अनेक बदल करत आहेत. शिस्त आणणे, चुकीच्या कामांना ब्रेक लावण्यास सुरुवात केलीय. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी आदेश काढून महापालिकेत प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठवले आहेत. सुमारे १५ दिवसांपूर्वी बदलीचे आदेश काढण्यात आलेत. काही अधिकाऱ्यांनी त्यांना क्रीम पोस्टिंग मिळावे यासाठी प्रयत्न केले होते.

पण आयुक्तांनी त्यांना योग्य वाटतील अशा बदल्या केल्या. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी आदेश काढत अजून काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. पण त्यात घनकचरा व्यवस्थापन विभागाचा समावेश नव्हता. पाच महिन्यांपूर्वीच उपायुक्त अविनाश सपकाळ यांची मिळकत कर विभागात बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची बदली करत त्यांना मोटर वाहन विभाग देण्यात आला.

त्यावेळी घनकचरा विभागाची जबाबदारी मिळावी यासाठी महापालिकेच्या तसेच शासनाच्या सेवेतील काही अधिकाऱ्यांनी दबाव आणला होता. तर काहीजणांनी मुंबईत मंत्र्याकडे जाऊन बदल्यांसाठी दबाव आणला. यावरून अधिकाऱ्यांमध्ये काहीशी तणाव निर्माण झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com