पुण्यात फक्त ₹७ लाखांत घर, म्हाडाची बंपर लॉटरी; हक्काच्या घरासाठी आजच अर्ज करा

Pune MHADA Lottery 2025: म्हाडाचा धमाका! पुण्यात फक्त ₹७ लाखात घर, आजच अर्ज भरा. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील घरांच्या किमतीत सूट.
Pune Mhada Lottery
Pune Mhada LotterySaam tv
Published On
Summary
  • पुणे म्हाडा लॉटरी 2025 मध्ये एकूण 4,186 घरे जाहीर

  • 1,982 घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतून विकली जाणार

  • सर्वात स्वस्त घरे फक्त ₹6.95 लाखांपासून सुरू

  • अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी म्हाडाची अधिकृत वेबसाईट उपलब्ध

मुंबई पुण्यात घर घेण्याचं स्वप्न प्रत्येकांच असतं. मात्र, वाढत्या घरांच्या किंमतीमुळे हे स्वप्न सर्वसामान्यांना परवडणं कठीण होतं. अशावेळी सर्वसामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं कार्य म्हाडा करत असतो. सध्या पुणे म्हाडाकडून घरांच्या सोडतीची घोषणा करण्यात आली आहे. पुणे मंडळामार्फत पुणे आणि आसपासच्या परिसरातील घरांच्या विक्रीसाठी नुकतीच लॉटरी जाहीर झाली. या लॉटरीत एकूण ४,१८६ घरांचा समावेश आहे. यातील १,९८२ घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर विकली जाणार आहेत.

पण पुणे म्हाडाकडून जारी करण्यात आलेल्या घरांच्या किंमती किती? लोकेशन कुठे? पाहुयात. पुणे म्हाडाकडून जाहीर करण्यात आलेल्या लॉटरीत सर्वात स्वस्त घरे २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेत आहेत. ही घरे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीत आहेत. येथील सदनिकांची किंमत ९,९५,९०० पासून सुरूवात होते. ते १२,०३,९०० रूपयांच्या दरम्यान आहे.

Pune Mhada Lottery
प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लॉजवर जबरदस्ती अन् शारीरिक संबंध; १४ वर्षीय मुलीसोबत 'नको ते घडलं'

या सदनिकेचे बांधकाम क्षेत्रफळ ३४.६१ ते ४१.८७ इतकी आहे. तसेच या सदनिकेचे चटई क्षेत्रफळ २३.६० ते २९.०२ आहे. या योजनेत एकूण ६४ सदनिका आहेत.

Pune Mhada Lottery
गोविंद बर्गे प्रकरणात मोठा ट्विस्ट; माजी उपसरपंचांकडून पूजाला साडेसात लाख रूपयांची भेटवस्तू

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील घरांच्या किंमती किती?

पुणे म्हाडातील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील घरांची किमंती सर्वात कमी आहे. या योजनेअंतर्गत येणाऱ्या घरांच्या किंमती ७ लाखांहून कमी आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेचा संकेत क्रमांक ८६७-बी असून, चाकण, ता. खेड, जि. पुणे सर्व्हे नं. ८१८ (पीएमएवाय) १ आरके असे आहे.

Pune Mhada Lottery
आई अन् मुलानं १३ व्या मजल्यावरून उडी मारली; पती झोपलेला असताना आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमधून माहिती उघड

या सदनिकांची अंदाजे किंमत ६९५,००० रूपये असल्याची माहिती आहे. तर, या सदनिकांची बांधकाम क्षेत्रफळ (चौ.मी) २७.७४ इतके आहे. तर, सदनिकेचे चटई क्षेत्रफळ (चौ.मी) २३.७४ इतके आहे. या योजनेत एकूण सदनिका ३ आहेत. म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला अधिक माहिती मिळेल.

Pune Mhada Lottery
विदर्भात भाजपाला धक्का! बड्या नेत्यासह समर्थकांनी हाती बांधलं घड्याळ; राजकीय वर्तुळात खळबळ

महत्वाच्या तारखा

  • सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात अन् ऑनलाईन रक्कम स्विकृती सुरुवात – 11 सप्टेंबर 2025 (दुपारी 12.30 वाजल्यापासून)

  • सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख अन् ऑनलाईन रक्कम स्विकृती अंतिम तारीख– 31 ऑक्टोबर 2025 (रात्री 11.59 वाजेपर्यंत)

  • बँकेत RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्याची तारीख – 1 नोव्हेंबर 2025 (संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत)

  • सोडतीसाठी स्विकृत अर्जाच्या प्रारुप यादीची प्रसिद्धी – 11 नोव्हेंबर 2025 (सायंकाळी 6 वाजेपर्यंत)

  • दावे, हरकती दाखल करण्याची तारीख – 13 नोव्हेंबर 2025 (दुपारी 12 वाजेपर्यंत)

  • सोडतीसाठी स्विकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी – 17 नोव्हेंबर 2025 (सायंकाळी 6 वाजेपर्यंत)

  • सोडत दिनांक – 21 नोव्हेंबर 2025 (दुपारी 12 वाजता)

  • यशस्वी अर्जदारांची नावे वेबसाईटवर प्रसिद्ध करणे – 21 नोव्हेंबर 2025 (सायंकाळी 6 वाजेपर्यंत).

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com