गोविंद बर्गे प्रकरणात मोठा ट्विस्ट; माजी उपसरपंचांकडून पूजाला साडेसात लाख रूपयांची भेटवस्तू

Beed Shocker Govind Barge: बीडचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण; नर्तकी पूजा गायकवाड पोलिसांच्या ताब्यात. तपासातून धक्कादायक माहिती उघड.
Beed Shocker Govind Barge
Beed Shocker Govind BargeSaam
Published On
Summary
  • बीडचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केली.

  • नर्तकी पूजा गायकवाडला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक.

  • तपासात महागड्या भेटवस्तू व साडेसात लाखांचा प्लॉट गिफ्ट केल्याचं उघड.

  • आर्थिक व्यवहार, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि पिस्तुलाचा शोध यावर पोलिसांचा तपास सुरू.

बीडचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची माहिती आहे. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकणी नर्तिका पूजा गायकवाडला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या ती ३ दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. सध्या वैराग पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. घटनास्थळी वापरण्यात आलेली पिस्तूल नेमकी कुठून आली? त्यात किती बुलेट होत्या?गोविंद बर्गेंकडे बुलेट कशी आली? याचा तपास सुरू आहे. तपासात गोविंद यांनी पूजाला प्लॉट गिफ्ट केल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या पोलिसांनी कॉल लॉग तसेच आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी बँकेतील स्टेटमेंट जप्त केले आहेत. पूजासोबत झालेले आर्थिक व्यवहार, मोबाईलवरील संवाद, याची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे. यासाठी अतिरिक्त वेळ आवश्यक असल्याचं पोलिसांनी न्यायालयाकडे स्पष्ट केलं. त्यामुळे पुजाची पोलीस कोठडी वाढण्याची शक्यता आहे.

Beed Shocker Govind Barge
प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लॉजवर जबरदस्ती अन् शारीरिक संबंध; १४ वर्षीय मुलीसोबत 'नको ते घडलं'

गोविंद यांनी आतापर्यंत पूजाला महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. महागडा मोबाईल दिला आहे. तरीही पूजाच्या मागण्यांची लिस्ट काही संपत नव्हती. तिनं बंगल्याचीही मागणी केली होती. गोविंद यांनी वैराग येथील सुमारे साडे सात लाख रूपयांचा प्लॉट खरेदी करून दिला होता, हे तपासातून उघड झालं आहे.

Beed Shocker Govind Barge
नेपाळ, फ्रान्सनंतर इंग्लंडमध्ये उद्रेक, लंडनमध्ये लाखो लोक रस्त्यावर, पोलिसांवर बाटल्या फेकल्या

प्लॉट रजिस्टर खरेदीच्या कागदपत्रात गोविंद बर्गे यांनी साक्षीदार म्हणून सही केलीय. यावरून गोविंद यांनीच पूजाला प्लॉट खरेदी करून दिल्याची माहिती आहे. त्यामुळे नातेवाईक करत असलेल्या आरोपांवर तथ्य सापडलं आहे. दरम्यान, गोविंद यांनी पूजावर किती रूपयांची उधळण केली आहे, हे लवकरच पोलिसांच्या तपासातून उघड होईल.

Beed Shocker Govind Barge
माजी उपसरपंचानं गोळी घातली, तेव्हा पूजा कुठे होती? बँक डिटेल्स अन् कॉल लॉग जप्त, बंगल्याविषयी मोठी माहिती हाती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com