Former Deputy Sarpanch Govind Barge
Former Deputy Sarpanch Govind BargeSaam

माजी उपसरपंचानं गोळी घातली, तेव्हा पूजा कुठे होती? बँक डिटेल्स अन् कॉल लॉग जप्त, बंगल्याविषयी मोठी माहिती हाती

Former Deputy Sarpanch Govind Barge: माजी उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे; नर्तिकेचे कबूलनामे समोर. दीड वर्षातच कोट्यवधींचा खर्च, ५ कोटींचा बंगला मागितल्याचा आरोप.
Published on
Summary
  • बीडमधील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यू प्रकरणात नवे खुलासे.

  • नर्तिका पूजाचे प्रेमसंबंध कबूल, कोट्यवधींचा खर्च आणि ५ कोटींच्या बंगल्याची मागणी उघड.

  • गोविंदच्या विरोधात कुटुंबीयांचा आरोप : दीड वर्षातच आर्थिक नुकसान.

  • वैराग पोलिसांकडून पूजाच्या लोकेशन व बँक डिटेल्सची चौकशी सुरू.

बीडच्या लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यू प्रकरणातून अनेक बाबी समोर येत आहेत. पोलिसांसमोर नर्तिका पूजा गायकवाडने गोविंद यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचं कबूल केलं. मिळालेल्या माहितीनुसार, पूजानं दीड वर्षातच गोविंद यांना कंगाल केलं होतं, असा आरोप गोविंद यांच्या नातेवाईकांनी केला होता. पूजानं गोविंद यांच्याकडे ५ कोटींचा बंगला मागितल्याची माहिती समोर आली आहे.

१५ सप्टेंबरला पूजाचा वाढदिवस होता. गिफ्ट म्हणून तिनं गोविंदकडे मोठी गोष्ट मागितली होती. तिनं गोविंदकडे ५ कोटींचा बंगला मागितला होता. तिनं त्याच्यांसमोर हट्ट धरला होता, अशी माहिती पोलसी तपासातून समोर आली आहे. याच कारणामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं, असा अंदाज व्यक्त केला आहे.

Former Deputy Sarpanch Govind Barge
रीलस्टार प्रतिक शिंदेच्या फॉर्च्युनरमुळे भीषण अपघात; तीन गाड्यांना धडक बसली, नेमकं काय घडलं?

गोविंद हे लुखामसला गावचे माजी उपसरपंच तसेच त्यांचा प्लॉटिंगचाही व्यवसाय होता. आतापर्यंत त्यांनी पूजावर भरपूर पैसे उधळले होते. सोने - चांदीचे दागिने, महागडा मोबाईल भेट म्हणून दिलं होतं. घरच्यांच्या विरोधात जाऊन गोविंद पूजाला भेटत होता. तसेच भेटवस्तू देत होता. तिचा नंतर गोविंदच्या बंगल्यावर डोळा होता.

Former Deputy Sarpanch Govind Barge
रूग्णाला ऑपरेशन बेडवर सोडलं, दुसऱ्या रूममध्ये नर्ससोबत शारीरिक संबंध ठेवलं; डॉक्टरचा प्रताप

तिनं गोविंदकडे बंगला मागितला. पण गावातील बंगला दिल्यावर गावात बदनामी होईल, म्हणून गोविंद यांनी नकार दिला. गोविंद त्याबदल्यात पूजाला दुसरा बंगला द्यायला तयार झाले होते. मात्र, पूजानं त्यानंतर अबोला धरला. गोविंद तिला भेटण्यासाठी कला केंद्रात जात होता. पण ती भेटत नव्हती. आत्महत्येच्या दिवशी गोविंद सासूरे गावात गेले. पूजा पारगावच्या कला केंद्रात होती. पण तिनं भेटण्यास नकार दिला होता. पोलिसांसमोर पूजानं कला केंद्रात असल्याचं कबूल केलं. त्यामुळे पूजा घटनेच्या दिवशी कला केंद्रातच होती का? याचा तपास वैराग पोलिसांकडून सुरू आहे.

Former Deputy Sarpanch Govind Barge
ठाणे, पुण्यासह ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाचा GR जाहीर, वाचा यादी | VIDEO

वैराग पोलिसांनी तिचा सीडीआर आणि लोकेशन मागवले आहे. तसेच पूजानं गोविंदकडून आतापर्यंत किती रक्कम घेतली? बँक डिटेल्स पोलिसांनी मागवले आहे. यातून आर्थिक व्यवहाराची माहिती समोर येईल, असं पोलिसांनी सांगितलं. सध्या पूजा पोलीस कोठडीत असून,उद्या पुन्हा तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com