

Pune Daund Railway Coach Fire: पुणे येथील दौंड रेल्वे स्थानकात आज एका रेल्वेला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. येथील रेल्वे स्थानकात साइडिंगला लावलेल्या रॅक मधील एका रिकाम्या डब्ब्याला ही आग लागली होती. यामध्ये रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे.
या डब्बायला आग लागल्यानंतर येथील रॅकच्या वर उच्च क्षमतेच्या वीजवाहक तारा होत्या. मात्र रेल्वे प्रशासनाने वेळीच आग विझविल्याने मोठे नुकसान टळले.
कशी लागली आग?
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी ही आग लागली होती. दौंड रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक सहा पुढील पुणे बाजूला असलेल्या लोहमार्गावर प्रवासी डब्ब्यांचा एक रॅक साइडिंगला लावलेला आहे. त्यापैकी एक प्रवासी डब्बाला आग ही लागली. (Latest Marathi News)
या डब्ब्याच्या वर उच्च क्षमतेच्या वीजवाहक तारा होत्या. ज्यामुळे मोठ्या अपघाताचा धोका खूप वाढला होता. या आगीची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून आपत्कालीन परिस्थिती वाजविले जाणारे भोंगे वाजविण्यात आले. ज्यामुळे यंत्रणा सतर्क झाल्या.
यानंतर दौंड लोहमार्ग पोलिस, रेल्वे सुरक्षा दल, कॅरेज अॅण्ड वर्क्स , अॅक्सिडेंट रिलिफ ट्रेन, आदी यंत्रणा आग विझविण्यासाठी सक्रिय झाल्याने मोठी दुर्घटना टळली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.