Pune Crime News: पुण्यात कोयत्या गँगचा हैदोस सुरुच; टोळक्याने केली पोलिसाच्या मुलाची हत्या, परिसरात खळबळ

Pune Crime News: पुण्यात कोयत्या गँगचा हैदौस सुरुच आहे. पुण्यात सिंहगड रस्त्यावर पोलिसाच्या मुलाची हत्या झाल्याची घटना घडली आहे.
Pune Crime News:
Pune Crime News:Saam tv
Published On: 

सचिन जाधव

Pune Crime News:

पुण्यात कोयत्या गँगचा हैदौस सुरुच आहे. पुण्यात सिंहगड रस्त्यावर पोलिसाच्या मुलाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. चार ते पाच हल्लेखोरांनी कोयत्याने वार करत पोलिसाच्या मुलाची हत्या केली आहे. आज शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात सिंहगडमध्ये लाईन बॉय विजय ढुमे यांचा धारदार हत्यार आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सिंहगड रोडवरील क्वॉलिटी लॉजजवळ ही घटना घडली. आज सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही हत्येची धक्कादायक घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्याच्या सिंहगड येथील एका लॉजमधून विजय ढुमे खाली उतरत होते. या लॉजमधून खाली उतरल्यानंतर बाहेर पडत असताना चार ते पाच हल्लेखोरांनी विजय ढुमे यांच्यावर अचानकपणे हल्ला केला. हल्ल्यानंतर विजय ढुमे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले.

सिंहगड रोड पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. या हत्या प्रकरणातील आरोपींचा तपास सुरू आहे. या हत्ये प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Pune Crime News:
Bihar Crime News: रक्ताच्या थारोळ्यात सापडला हात, ट्रेनमध्ये पळापळ; कोटा-पाटणा एक्स्प्रेसमधील थरारक घटना

काय आहे प्रकरण?

मावळमध्ये 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास आरोपी विजय मालपोटे याने नऊ वर्षीय बालिकेला चॉकलेट देण्याच्या आमिष दाखवलं. त्यानंतर या आरोपीने लैंगिक अत्याचार केला होता.

या कृत्यानंतर चूक केल्याचे जाणीव झाल्यानंतर त्याने जीवन प्रवास संपवला. या घटनेने खळबळ उडाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहे.

Pune Crime News:
Ahmedabad Crime News: महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण; केस ओढून फरपटत नेलं, संतापजनक कृत्य CCTV कॅमेऱ्यात कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com