Khed : सावधान! करणीच्या नावाखाली भोंदू बाबाने पाडली कुटुंबात फूट; खेडमध्ये संतापजनक घटना

Pune Khed News : पुण्यातील खेड तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन कथित भगतांनी ‘चेडा’ आणि ‘करणी’च्या नावाखाली कुटुंबात भीती निर्माण करत फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे.
Khed : सावधान! करणीच्या नावाखाली भोंदू बाबाने पाडली कुटुंबात फूट; खेडमध्ये संतापजनक घटना
Pune Khed NewsSaam Tv
Published On
Summary
  • पुण्यातील खेडमध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली धक्कादायक प्रकार

  • दोन कथित भगतांवर कुटुंबात फूट पाडल्याचा आरोप

  • ऑडिओ रेकॉर्डिंगमुळे प्रकरण उघड

  • पोलिसांकडे तक्रार, तपास सुरू

रोहिदास गाडगे, पुणे

राज्यभरात देवदेवतांच्या नावाखाली अंधश्रेद्धेचा भयावह प्रकार घडतं आहे. नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर ठिकठिकाणाहून अनेक भोंदूंचे कारनामे समोर आले. २० व्या शतकातसुद्धा महाराष्ट्र अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला पाहायला मिळत असून ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. नाशिकनंतर पुन्हा एकदा पुण्यातील खेडमध्ये ‘चेडा’, ‘करणी’ आणि भूतबाधेची भीती दाखवत, एका कुटुंबात फूट पाडण्याचा अघोरी प्रयत्न केल्याचा आरोप दोन कथित भगतांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी पुरावेही समोर आले असून खेड उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील खेड तालुक्यातील मंदोशी येथील किसन तळपे आणि राजपूर येथील मंगेश कारोटे या दोन कथित भगतांनी संगनमताने हा प्रकार केल्याचा आरोप आहे. सदर प्रकाराचे ऑडिओ रेकॉर्डिंग समोर आले आहेत. या रेकॉर्डिंगनुसार, भगतांनी “घरात चेडा आणून ठेवला आहे, जागरण करून तो कुटुंबात सामील करावा लागेल.” अशा भीतीदायक गोष्टी सांगत पीडित कुटुंबीयांच्या मनात संशय आणि भीती निर्माण केली.

Khed : सावधान! करणीच्या नावाखाली भोंदू बाबाने पाडली कुटुंबात फूट; खेडमध्ये संतापजनक घटना
Political News : ऐन निवडणुकीच्या काळात बड्या नेत्यानं सोडली भाजपची साथ; तृणमूल काँग्रेसमध्ये केला प्रवेश

घरासमोर थडगे असल्याचा बनाव करत अघोरी विधी करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्नही करण्यात आला. तसेच “एकाची पोळी भाजली जाईल, बाकीच्यांची करपून जाईल” अशा विधानांतून कुटुंबात फूट पाडण्याचा स्पष्ट प्रयत्न दिसून येतो. याचबरोबर, तांदूळ गोळा करून नैवेद्य दाखवणे, “उजवा-डावा प्रसाद” आणि “तांबडा अंगारा” यांसारख्या गोष्टींचा वापर करून दैवी शक्तीचा खोटा आभास निर्माण करण्यात आला.या संपूर्ण प्रकारामुळे संबंधित कुटुंब मानसिक तणावाखाली असून, सोशल मीडियावर ऑडिओ व्हायरल झाल्याने त्यांची बदनामीही झाली आहे.

Khed : सावधान! करणीच्या नावाखाली भोंदू बाबाने पाडली कुटुंबात फूट; खेडमध्ये संतापजनक घटना
Political News : काँग्रेस नेत्याची घरात घुसून हत्या, गाढ झोपेत असतानाच धारदार शस्त्राने हल्ला करत जागीच संपवलं

या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अशा नराधमांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. महाराष्ट्रात अजून असे किती भोंदू बाबा आपलं पोट भरण्यासाठी दुसऱ्याचं नुकसान करत आहेत, हे समोर येणं गरजेचं आहे. तसेच अशा अंधश्रद्धेला नागरिकांनी बळी न पडता तुमच्यासोबत होणाऱ्या चुकीच्या गोष्टींची माहिती वेळोवेळी पोलिसांना देऊन सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com