पुण्याचा बिहार होतोय? दिवसाढवळ्या तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न

Pune Law and Order Crisis: पुण्यात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालाय. भररस्त्यात एका तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आलाय. मात्र, स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे तरुणीची नराधमाच्या तावडीतून सुखरूप सुटका झाली. तरुणीसोबत नेमकं काय घडलं?... पाहूयात या रिपोर्टमधून...
Pune Katraj Kondhwa Road girl kidnapping attempt latest news
Pune Katraj Kondhwa Road girl kidnapping attempt latest newssaam tv
Published On: 

राज्याची परिस्थिती युपी-बिहारपेक्षाही वाईट होत चाललीये का, असा प्रश्न पडावा. अशी ही दृश्य आहेत...पुण्यात भररस्त्यात एका तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न एका व्यक्तीनं केलाय...कात्रज-कोंढवा रोडवरील सुखसागरनगर परिसरात भर दिवसा घडलेली ही घटना आहे..एका 18 वर्षीय तरुणीची छेड काढत तिला थेट उचलून नेण्याचा प्रयत्न हा नराधम करतोय...मात्र, नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे नराधमाच्या तावडीतून तरुणीसोबतची सुखरुप सुटका झालीय...

या घटनेनंतर लेकीच्या सुरक्षेसाठी बापानं अक्षरशा: हात पसरलेत... आधीच पुण्यात गुन्हेगारांचा सुळसुळाट आहे...अशातच भर रस्त्यात दिवसाढवळ्या अशा घटना घडत असतील तर मग पुण्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही..रस्त्यावरून चालणाऱ्या मुलींसोबत जर अशा घटना घडत असतील तर मग पोलिसांचा काही धाक उरलेला आहे का नाही...

कोयत्या गँग आणि खंडणी मागणाऱ्या भाईदादांनी आधीच पुण्यात हैदोस घातलाय..अशातच पुण्यात रहदारीच्या रस्त्यावर कोयता फिरवत दहशत माजवणाऱ्या एका तरूणाचा एक व्हिडिओ समोर आलाय. वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत. हे जर असंच सुरू राहील . तर पुण्याचा युपी-बिहार झाल्याशिवाय राहणार नाही...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com