
अक्षय बडवे, साम टीव्ही
पुणे : पुण्यातील आयटी कंपनीत काम करणाऱ्या शुभदा कोदारेच्या हत्येने खळबळ उडाली आहे. तिच्या सहकाऱ्याने पार्किंगमध्ये चॉपरने हल्ला करून तिला संपवलं. या प्रकारानंतर पोलिसांनी सहाकाऱ्याला अटक केली आहे. पुण्यातील आयटी कंपनीतील शुभदाच्या हत्येनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या हत्येचं धक्कादायक कारणही समोर आलं आहे.
पुण्यातील येरवडा येथील आयटी कंपनीत काम करत असलेल्या शुभदा कोदारे हिच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई केली. शुभदाची हत्या करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी तातडीने अटक केली. त्यानंतर आज कोर्टात हजर केलं होतं. त्यानंतर आज आरोपीला याला १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कृष्णा कनोजा असे आरोपीचे नाव आहे. दोघांमध्ये झालेल्या आर्थिक वादातून कृष्णाने त्याची सहकारी शुभदा कोदारे हिची हत्या केली आहे.
शुभदा आणि कृष्णा हे दोघे एकमेकांना ओळखत होते. ते दोघेही एकाच कंपनीत काम करत होते. या दोघांमध्ये आर्थिक वाद सुरु होते. दोघांमध्ये झालेल्या पैशांच्या देवाण घेवाणीवरून वाद निर्माण झाला होता. कंपनीतून संध्याकाळी ६.१५ वाजता काम संपवून घरी जाताना कृष्णाने तिला गाठलं. येरवडाच्या रामवाडी येथील WNS कंपनीच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली. त्यानंतर कृष्णाने भाजी कापण्यासाठी वापरलेल्या चॉपरने तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्याने तिच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर हल्ला केला.
कृष्णाच्या हल्ल्यात शुभदा जागीच कोसळली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात दाखल केलेल्या शुभदाचा अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकारानंतर पोलिसांनी शुभदावर हल्ला करणाऱ्या कृष्णाला पोलिसांनी तातडीने अटक केली. शुभदा कोदारे हिच्या हत्येने पुण्यात दहशत पसरली आहे. शुभदाच्या हत्येने हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.