Manpada Police : हत्तीच्या दातांची तस्करी; मानपाडा पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

Kalyan News : पोलिसांनी सापळा रचला असताना दोन संशयित इसम हत्तीचे दात घेऊन आल्याचे दिसताच पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून हत्तीचे दोन दात जप्त करण्यात आले आहेत
Manpada Police
Manpada PoliceSaam tv
Published On

अभिजित देशमुख
कल्याण
: वन्य प्राण्यांची शिकार करणे किंवा वन्य प्राण्यांचे अवयव विक्री करण्यास गुन्हा मानला जातो. अशात डोंबिवली परिसरात हत्तीचे दात विक्रीसाठी आणले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे हत्तीच्या दातांची तस्करी करणाऱ्या दोन जणांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे.  

आकाश पवार, नितीन धामणे अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. दरम्यान हत्तीचे दात विकण्यासाठी डोंबिवली घारडा सर्कल येथे दोन जण येणार असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीसीपी अतुल झेंडे, एसीपी सुहास हेमाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकरी राम चोपडे, संपत फडोळ, महेश राळेभात या मानपाडा पोलिसांच्या पथकाने डोंबिवली घारडा परिसरात सापळा रचला. 

Manpada Police
Hingoli Crime : वाळू माफियांची मुजोरी वाढली; महसूल अधिकाऱ्याला थेट डंपरखाली चिरडण्याचा प्रयत्न

साडेदहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत 

पोलिसांनी सापळा रचला असताना दोन संशयित इसम हत्तीचे दात घेऊन आल्याचे दिसताच पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून हत्तीचे दोन दात जप्त करण्यात आले आहेत. आकाश पवार, नितीन धामणे असे या दोघा आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून हत्तीचे दोन दात, एक स्कूटर, दोन मोबाईल असा एकूण दहा लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

Manpada Police
Dharmabad Red Chilli : धर्माबादच्या मिरचीचे दर घसरले; बांगलादेशातील परिस्थितीचा फटका

पोलिसांकडून तपास सुरु 

दरम्यान वन्य प्राण्यांचे अवशेष विक्रीस कायद्याने बंदी आहे. असे आढळून आल्यास विक्री करणारा व घेणारा असे दोन्ही गुन्हेगार समजले जातात. त्यानुसार मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या या दोघांनी हत्तीचे दात कुठून आणले. तसेच हे दात डोंबिवलीत कुणाला विकणार होते; याचा तपास मानपाडा पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com