Dharmabad Red Chilli : धर्माबादच्या मिरचीचे दर घसरले; बांगलादेशातील परिस्थितीचा फटका

Nanded News : नांदेडच्या धर्माबाद येथील लाल मिरची ही देशातच नव्हे तर विदेशातही प्रसिध्द आहे. आखाती देशातही मिरचीला मोठी मागणी धर्माबादची मिरची तिखट आणि चवीला उत्तम असल्याने या मिरचीला मोठी मागणी असते
Dharmabad Red Chilli
Dharmabad Red ChilliSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी

नांदेड : नांदेडच्या धर्माबादच्या लाल मिरचीला देश विदेशात मोठी मागणी असते. हि लाल मिरची व त्याची पावडर चांगली टिकून राहत असल्याने या मिरचीला अधिक मागणी असते. मात्र देश- विदेशात मागणी होत असलेल्या धर्माबादच्या मिरचीचे भाव कमी झाले आहेत. बांग्लादेशातील परिस्थितीचा फटका या मिरची उद्दोगाला बसत आहे. 

नांदेडच्या धर्माबाद येथील लाल मिरची ही देशातच नव्हे तर विदेशातही प्रसिध्द आहे. आखाती देशातही इथल्या मिरचीला मोठी मागणी आहे. धर्माबादची मिरची तिखट आणि चवीला उत्तम असल्याने या मिरचीला मोठी मागणी असते. परंतु सध्या मिरचीचे भाव गडगडले असून क्विंटल मागे पाच हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी आणि  व्यापाऱ्यांना कोटींचा फटका बसत आहे. 

Dharmabad Red Chilli
Zp School : जिल्हा परिषद शाळेतील चाललंय काय?; शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना चुकीचं ज्ञान, शिक्षकाचे थेट निलंबन

वेगवेगळ्या प्रकारच्या मिरचीचे उत्पादन
धर्माबाद येथे गावरान, ब्याडगी, काश्मिरी डब्बी, तेजा, जिटी, सी ५, २७३, सुपर टेन, अरमुर आणि वंडरहाट अश्या १० प्रकारची मिरची उपलब्ध असते. यातील तेजा ही सर्वात तिखट असते. तर काश्मिरी डबी ही कमी तिखट असते. धर्माबाद इथ १२ मिरची पावडर तयार करणारे कारखाने आहेत. यातून दोन हजार कामगारांना बारमाही रोजगार मिळतो. सध्या उत्पादन होत असून भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे.

Dharmabad Red Chilli
Hingoli Crime : वाळू माफियांची मुजोरी वाढली; महसूल अधिकाऱ्याला थेट डंपरखाली चिरडण्याचा प्रयत्न

बांगलादेशातील परिस्थितीचा फटका 

बांग्लादेशातील परिस्थितीचा फटका नांदेडच्या धर्माबाद येथील मिरची व्यापाऱ्यांना बसत आहे. बांगलादेशकडून नांदेडच्या धर्माबाद येथील मिरची आयात केली जात होती. परंतु आता ही आयात निर्यात बंद झाली आहे. दरम्यान मिरचीची आवक वाढली असून परिणामी लाल मिरचीचे भाव कमी झाले आहेत. क्विंटलमागे ५ हजारांची घसरण झाली असून भविष्यात आणखी दर कमी होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com