Pune Airport: पुणे विमानतळावर खळबळ, तब्बल १० कोटींचे ड्रग्ज जप्त

Seize Hashish Worth Rs 10 Crore: पुणे विमानतळावर महसूल गुप्तचर विभागाने मोठी कारवाई करत तब्बल १० कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सध्या तपास सुरू आहे.
Pune Airport
Pune AirportSaam Tv
Published On

अक्षय बडवे, पुणे

पुणे आंतरराष्ट्रीर विमानतळावर महसूल गुप्तचर विभागाने मोठी कारवाई केली. विमानतळावर तब्बल १० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी सापळा रचून २ जणांना महसूल गुप्तचर विभागाने अटक केली. याप्रकरणी महसूल गुप्तचर विभागाने मुंबईतून आणखी एकाला ताब्यात घेतले आहे. बँकॉक ते पुणे असा प्रवास करून आलेल्या प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बँकाकहून पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी दुपारी दोघे जण उतरले. त्यांच्याकडे डॅग्ज असल्याची माहिती ‘डीआरआय’च्या मुंबई पथकाला मिळाली होती. त्यानुसार या माहितीची खातरजमा केल्यानंतर महसूल गुप्तचर विभागाच्या पथकाने पुणे विमानतळावर सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केली. यावेळी तपासणी केली असता त्यांच्याकडे ड्रग्ज सापडले.

Pune Airport
Drugs Case: लातूरचा होतोय उडता पंजाब; पोलीस हवालदार की ड्रग्सचा सरदार

चौकशीदरम्यान त्यांच्याकडे असलेल्या सामानाची तपासणी करण्यात आली. तेव्हा प्लास्टिकच्या पिशवीत ड्रग्ज सापडले. चौकशीत मुंबईतील एकाकडे ड्रग्ज विक्रीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याच प्रकरणात डीआरआय’च्या पथकाने मुंबईतून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देखील ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत १० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले असून आंतराष्ट्रीय बाजारपेठेत जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत १० कोटी रुपये इतकी आहे.

Pune Airport
Tuljapur Drugs Case: तुळजापूर ड्रग्सच्या विळख्यात, ड्रग्जपुरा'तून 100 गायब?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com