Pune Milk : खवय्ये पुणेकरांचा आता दुधावरही डल्ला, गरम मसाला दूध, हळद दूध, केसर दुधाच्या मागणीत मोठी वाढ 

वारंवार चहा पिऊन पित्त वाढत असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दूध पिण्यास पसंती देतात.
Pune Milk
Pune MilkSaam Tv
Published On: 

पुणे: पुणे शहरातील सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि नवी पेठ परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून गरम दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुण्यातील पेठ परिसरामध्ये राहणारे नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गरम दुध फस्त करत असल्याच समोर आलं आहे (Pune Hot Milk Consumption Increases). 

Pune Milk
आंतरराष्ट्रीय तिरंदाज खेळाडू विकतोय चहा; पुरस्कार प्राप्त खेळाडूची शासनाकडून उपेक्षा

पुणे (Pune) शहरातील पेठाचा परिसर हा त्या राहणाऱ्या टिपिकल लोकांच्या वेगवेगळ्या आवडी - निवडीसाठी ओळखला जातो. पेठात राहणारे लोक कधी चिकन घेण्यासाठी रांगा लावतात. तर कधी बर्फ गोळा खाण्यासाठी रांगेत उभे असतात. तर आपल्या चहाला देखील अमृततुल्यचा मान देतात. मात्र, याच पेठात राहणारे नागरिक मोठ्या प्रमाणात दुधही फस्त करतात. अशी नवी माहिती समोर आली आहे.

पुणे शहरातील पेठांमधील वेगवेगळ्या चौकात मोठ्या प्रमाणात गरम दुधाचे स्टॉल (Hot Milk Stall) लागलेले पाहायला मिळत आहेत. या स्टॉलची संख्या पेठ परिसरामध्ये जवळपास 80 ते 100 इतकी आहे. यातील प्रत्येक स्टॉलवर गावरान हळदी युक्त गरम दूध मिळत असल्याने या गरम दुधाच्या मागणीत मोठी वाढ झालीये.

पुण्यातील पेठ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी (Students) राहतात. हे सर्व विद्यार्थी देखील चहा ऐवजी दूध पिण्यास प्राधान्य देतात. वारंवार चहा पिऊन पित्त वाढत असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दूध पिण्यास पसंती देतात.

पुणेकर चहा (Tea) पिण्यास पसंती देत असल्याने, पुणे शहरात चहाचे वेगवेगळे ब्रँड तयार झाले. मात्र, आता याच पुणे शहरात लवकरच गरम दुध (Milk) विक्रीचा देखील ब्रँड उदयास येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.