
पुण्याच्या एका तरुणीने रोज ९ तास झोपून ९.१ लाख रुपये कमवले आहेत. पुण्यातील यूपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थीनीने हे बक्षीस मिळवले आहे. पुण्यातीतल पूजा माधव वव्हाळ या तरुणीने हा विक्रम केला आहे. पूजाला Wakefit Sleep Intenship च्या चौथ्या सीझनमध्ये स्लीप चॅम्पियन ऑफ द ईअरसाठी निवडले गेले आहे.
पूजाला IPS व्हायचे आहे. ती यासाठी खूप मेहनत करते. तिने ६० दिवसांच्या इंटर्नशिपमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर आता तिला स्लीप चॅम्पियन ऑफ द इअर म्हणून घोषित केले आहे. पूजा रात्री ९ तास झोपतात. ९ तास झोपायच्या या इंटर्नशिपमध्ये तिला ९.१ लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे.
या इंटर्नशिप १ लाखांपेक्षा जास्त उमेदवारांची निवड करण्यात आली होती. त्यातील १५ उमेदवारांची निवड केली होती. यातील पूजा या स्लीप चॅम्पियन म्हणून निवड झाले आहेत
काय आहे ही इंटर्नशिप? (What Is Wakefit Internship)
वेकफीट कंपनीने ही स्लिप इंटर्नशिप केली होती. यामध्ये तुम्हाला रोज ९ तासांसाठी झोपायचे असते. यासाठी लाखो रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. पुण्यातील तरुणीने या इंटर्नशिपमध्ये अव्वल क्रमांक मिळवला आहे. तिला ९ लाख रुपये मिळाले आहे. तर इतर शॉर्टलिस्ट झालेल्या १६ उमेदवारांना प्रत्येकी १ लाख रुपये मिळाले आहेत.
Sleep Internship साठी अर्ज कसा करावा?
या इंटर्नशिपसाठी २२ किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
प्रत्येकजण फक्त एकदाच अर्ज करु शकतात. फॉर्म पुर्णपणे व्यवस्थित भरयचा आहे. अन्यथा तुमचा फॉर्म रद्द केला जाऊ शकतो.
सीझन १, २ आणि ३मध्ये सहभागी झालेले उमेदवार पुन्हा एकदा अर्ज करु शकतात.
तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. यासाठी दिलेल्या अटी आणि शर्ती मान्य कराव्यात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.