Ganpati Visarjan 2025 : पुण्यात ३० तासानंतरही विसर्जन मिरवणुका सुरुच, गणेश मंडळाने डीजे लावला अन् फटाके फोडले, पोलिसांचा आदेश धाब्यावर

Pune News : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल ३० तास उलटूनही सुरूच असून पोलिसांचे नियोजन कोलमडल्याचे स्पष्ट झाले आहे. वाहतूक कोंडी, अव्यवस्था आणि मंडळांच्या मनमानी कारभारामुळे पुणेकर हैराण झाले आहेत.
Ganpati Visarjan 2025 : पुण्यात ३० तासानंतरही विसर्जन मिरवणुका सुरुच, गणेश मंडळाने डीजे लावला अन् फटाके फोडले, पोलिसांचा आदेश धाब्यावर
Pune NewsSaam Tv
Published On
Summary
  • पुण्यातील विसर्जन मिरवणूक तब्बल २९ तास उलटूनही सुरूच

  • पोलिसांचे नियोजन कोलमडले, मंडळांनी नियमांकडे दुर्लक्ष केले

  • वाहतूक कोंडी, फटाक्यांची आतषबाजी आणि शिस्तीचा अभाव

  • पुणेकर त्रस्त, पोलिस हतबल आणि प्रशासनावर टीका

सागर आव्हाड, पुणे

एकीकडे मुंबईतील मानाच्या लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर समुद्रातील भरतीमुळे गेले सहा तास विसर्जन रखडले आहे. तब्बल २४ तास उलटूनही लालबागच्या राजाचे विसर्जन झालेले नाही. तर दुसरीकडे पुणे शहरात तब्बल ३० तासांपेक्षा जास्त वेळ उलटूनही ती अद्याप सुरूच आहे. या विलंबामुळे पुणे पोलिसांचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचं चित्र दिसत आहे.

पुण्यात महत्त्वाचे पाच आणि काही महत्वाच्या मंडळांनी शिस्तबद्धपद्धतीने वेळेचे पालन करत गणरायाला निरोप दिला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून गणरायाच्या आगमनासाठी आणि विसर्जनासाठी पुण्यात नियोजन सुरु होते. मात्र या नियोजनावर पाणी फिरल्याचं चित्र दिसत आहे. पुणे पोलिसांनी मिरवणुकीसाठी योग्य नियोजन केल्याचा दावा केला होता, मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच दिसत आहे.

Ganpati Visarjan 2025 : पुण्यात ३० तासानंतरही विसर्जन मिरवणुका सुरुच, गणेश मंडळाने डीजे लावला अन् फटाके फोडले, पोलिसांचा आदेश धाब्यावर
Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

मिरवणूक अत्यंत संथ गतीने पुढे सरकत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून होणारे नाच-गाणे आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे मिरवणुकीला आणखी उशीर होत आहे. विशेषतः अलका टॉकीज चौकात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गर्दीच्या ठिकाणी फटाके उडवल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Ganpati Visarjan 2025 : पुण्यात ३० तासानंतरही विसर्जन मिरवणुका सुरुच, गणेश मंडळाने डीजे लावला अन् फटाके फोडले, पोलिसांचा आदेश धाब्यावर
Ganapati Festival 2023: बाप्पाच्या भक्तीत रमली रुचिरा, खास फोटो!

या सर्व प्रकारामुळे पुणे पोलीस हतबल झाल्याचं दिसून येत आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांना नियंत्रित करण्यात पोलिसांना अपयश आल्याची चर्चा सध्या सुरू आहे. काही मंडळांकडून पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून आपली मनमानी सुरूच असल्याचंही समोर आलं आहे. पोलिसांच्या मते, प्रत्येक मंडळाला वेळेवर विसर्जन करण्याची विनंती करण्यात आली होती, मात्र अनेक मंडळांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही.

Ganpati Visarjan 2025 : पुण्यात ३० तासानंतरही विसर्जन मिरवणुका सुरुच, गणेश मंडळाने डीजे लावला अन् फटाके फोडले, पोलिसांचा आदेश धाब्यावर
Pune Ganapati Visarjan: पुण्यातील मानाचे गणपती विसर्जन मिरवणुकीचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण मार्ग

या विलंबामुळे सर्वसामान्य पुणेकरांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. वाहतूक कोंडी, सार्वजनिक व्यवस्थेवरील ताण आणि शांततेचा भंग यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पुणे पोलीस आणि गणपती मंडळांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत असून, याचा फटका संपूर्ण शहराला बसत आहे. नियोजनाचा अभाव आणि मंडळांकडून नियमांची पायमल्ली यामुळे ही मिरवणूक रेंगाळली असून, ती कधी संपेल हे सांगणं कठीण आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना आता अधिक कठोर पाऊले उचलावी लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com