Aaba Bagul : आबा बागुल पुण्यात काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत? २ दिवसांत निर्णय जाहीर करणार

aaba bagul Latest News : आता दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी आणि इतरांशी बोलून योग्य निर्णय जाहीर करू, असं म्हणत आबा बागुल यांनी पुण्यात काँग्रेसला धक्का देण्याची तयारी केल्याचं बोललं जात आहे.
Aaba Bagul : आबा बागुल पुण्यात काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत? २ दिवसांत निर्णय जाहीर करणार
Aaba BagulSaam tv

अक्षय बडवे, पुणे

पुणे : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसकडून रवींद्र धंगेकरांना उमेदवार जाहीर झाल्यानंतर पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. रवींद्र धगेंकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुण्याचे माजी महापौर आबा बागुल यांनी उमेदवारीवरून नाराजी बोलून दाखवली. गेल्या काही दिवसांपासून आबा बागुल यांची नाराजी कायम आहे. त्यात आबा बागुल यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर आता दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी आणि इतरांशी बोलून योग्य निर्णय जाहीर करू, असं म्हणत आबा बागुल यांनी पुण्यात काँग्रेसला धक्का देण्याची तयारी केल्याचं बोललं जात आहे.

पुण्यात रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुण्याचे माजी महापौर आबा बागुल यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मी कोणाच्या चपला उचलणार नाही, असं म्हणत आबा बागुल यांनी टीका केली होती. धंगेकरांच्या उमेदवारीनंतर आबा बागुल हे भावुक होत प्रतिक्रिया दिली होती. काँग्रेसच्या निर्णयाच्या विरोधात आबा बागुल यांनी खदखद व्यक्त केली होती. धंगेकरांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी उमेदवारीसाठी चाचपणी सुरु केली होती.

Aaba Bagul : आबा बागुल पुण्यात काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत? २ दिवसांत निर्णय जाहीर करणार
Vishal Patil News: विशाल पाटील लोकसभा लढण्यावर ठाम! सांगलीतून मोठी अपडेट समोर

आबा बागुल यांनी नागपुरात सोमवारी भाजप नेते, उममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. एका लग्न समारंभामध्ये आबा बागुल हे भाजपच्या दोन्ही नेत्यांना भेटले. ही राजकीय भेट नसून लग्नात भेट झाल्याचं बागुल यांनी दावा केला होता. त्यानंतर आज त्यांनी नवी भूमिका साम टीव्हीशी बोलताना स्पष्ट केली आहे.

Aaba Bagul : आबा बागुल पुण्यात काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत? २ दिवसांत निर्णय जाहीर करणार
Lok Sabha Election: आश्चर्यच! लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच निवडणूक आयोगाने जप्त केले 4,650 कोटी रुपये

'दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी आणि इतरांशी बोलून योग्य निर्णय जाहीर करू, अशी माहिती आबा बागुल यांनी साम टीव्हीला दिली. आम्ही अद्याप कुठल्याही अंतिम निर्णयावर पोहोचलो नाही. देवेंद्र फडणवीस यांना कानावर अनेक गोष्टी घातल्या, असेही आबा बागुल यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्षातील काही नेत्यांवर अजूनही अबा बागुल यांची नाराजी कायम असल्याचे बोलले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com