Lok Sabha Election: आश्चर्यच! लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच निवडणूक आयोगाने जप्त केले 4,650 कोटी रुपये

Election Commission of India: निवडणूक आयोगाने मोठी कारवाई करत एकूण 4650 कोटी रुपये जप्त केले आहेत. देशातील लोकसभा निवडणुकीच्या 75 वर्षांच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वाधिक जप्ती आहे.
Election Commission of India
Election Commission of IndiaSaam Tv

Lok Sabha Election 2024:

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. पारदर्शक निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केली आहे. नेत्यांच्या भाषणांवर आयोगाचं लक्ष आहे. याशिवाय अवैध पैशांच्या व्यवहारांवरही कारवाई करण्यात येत आहे.

यातच निवडणूक आयोगाने मोठी कारवाई करत एकूण 4650 कोटी रुपये जप्त केले आहेत. देशातील लोकसभा निवडणुकीच्या 75 वर्षांच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वाधिक जप्ती आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

Election Commission of India
Arvind Kejriwal: अरविंद केजरीवालांना दिलासा देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, ईडीला 24 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश

लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने जप्त केलेली रक्कम 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा जास्त आहे. निवडणूक आयोगाने सांगितलं की, अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीआधी 1 मार्चपासून दरदिवशी कारवाई करत 100 कोटींहून अधिक रक्कम जप्त केली आहे.

याबद्दल बोलताना आयोगाने सांगितलं आहे की, "2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसह निवडणूक आयोगाने देशातील लोकसभा निवडणुकीच्या 75 वर्षांच्या इतिहासात आतापर्यंतची सर्वाधिक जप्तीची नोंद केली आहे. या जप्तीत पथकात फ्लाइंग स्क्वॉड आणि सांख्यिकी निरीक्षण पथकाचा समावेश आहे. तसेच या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये रोख रक्कम, दारू, मोफत वस्तू आणि मादक पदार्थांची कोणतीही हालचाल किंवा वितरण होणार नाही, याची खात्री करण्यासाठी व्हिडिओ पाहणारे पथके आणि सीमा चौक्या सतत 24 तास कार्यरत आहेत.''

Election Commission of India
Ram Satpute: सोलापुरकरांनी ठरवलंय; माझं पार्सल दिल्लीला पाठवायचं..राम सातपुतेंचा धैर्यशील मोहितेंवर पलटवार!

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून रोजी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने आधीच जाहीर केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com