पुण्याच्या बुधवार पेठेत तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई! एकच खळबळ

Pune Fda Raid Paneer Khoya Seized Before Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मिठाईची खरेदी करायला जात असाल तर खबरदारी घ्या... कारण एफडीएनं तब्बल हजारो किलो खवा आणि पनीर जप्त केलंय... एफडीएनं नेमकी कुठे धाड टाकलीये?... आणि या कारवाईला कुणी आव्हान दिलंय?... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...
Pune FDA raid on paneer and khoya before Ganeshotsav
Pune FDA raid on paneer and khoya before Ganeshotsavsaam tv
Published On

राज्यात सणासुदीचं वातावरण असून नागरिकांची खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये रेलचेल सुरू आहे. विशेष म्हणजे, सणांच्या काळात गोडव्यासाठी मिठाईचं मुख्य आकर्षणही असतं. मात्र, आता ऐन सण-उत्सवातली हीच मिठाई तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. होय.. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडीए अॅक्शन मोडवर आलीये. अशातच आता एफडीएच्या पथकानं पुण्यातील बुधवार पेठेत धाड घातल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आलीय.

पुण्यात FDAची मोठी कारवाई

बुधवार पेठ परिसरातून 4 ट्रक पनीर आणि खवा जप्त

5 हजार किलो खवा आणि 12 हजार किलो पनीर जप्त

ट्रक परराज्यातून आल्याचा संशय

जप्त केलेल्या साठ्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले

दरम्यान, राज्यात गणेशोत्सवाच्या निमित्तानं खाद्यपदार्थांची मागणी वाढत असल्याने भेसळ रोखण्यासाठी FDAनं विशेष मोहीम राबवत भेसळखोरांना इशारा दिलाय. तर दुसरीकडे, FDAनं 4 ट्रक पनीर आणि खवा जप्त केल्यानंतर दुध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत. गाई-म्हशीच्या दुधापासून शुद्ध पनीर बनवून विकत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केलाय.

खरंतर, डोंबिवलीत सांगलीहून आणलेले तब्बल ५०० लिटर सुटे भेसळयुक्त दूध एफडीएनं नष्ट केलं. त्यानंतर आता एफडीएच्या धडक कारवाईमुळे पुण्यातील खाद्य व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणलेत. सणासुदीच्या काळातील मागणी पाहता अन्नपदार्थांमध्ये भेसळ करून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारे अनेक प्रकार घडत असतात. याच पार्श्वभूमीवर एफडीएनं आपली मोहीम आणखी तीव्र केलीये. मात्र, नागरिकांनीही सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांची खरेदी करताना खबरदारी बाळगणंही तितकचं गरजेचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com