Pune Accident : पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह; मद्यधुंद बस चालकाने ४ वाहनांना उडवलं

Pune Accident News : पुणे शहरात पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्हची घटना घडली आहे; मद्यधुंद बस चालकाने ४ वाहनांना उडवल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह; मद्यधुंद बस चालकाने ४ वाहनांना उडवलं
Pune Accident :Saam tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा ड्रंक अँड ड्राईव्हची घटना घडली आहे. पुण्यात खासगी बसच्या चालकाने ३ ते ४ वाहनांना धडक दिली आहे. मद्यधुंद बस चालकाकडून पुण्यातील कोथरूड भागात अपघात झाला आहे. या अपघाताने कोथरूड भागात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोथरुड भागात मद्यधुंद बस चालकाने ३ ते ४ वाहनांना उडवलं आहे. खाजगी कंपनीच्या बसच्या चालकाने ३ ते ४ वाहनांना धडक दिली. या अपघातात २ जण जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.

पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह; मद्यधुंद बस चालकाने ४ वाहनांना उडवलं
Varangaon Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू, दोनजण जखमी

बस चालकाने धडक दिल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं आहे. या अपघाताने पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटनेत आणखी एक भर पडली आहे.

पुणेकरांची चिंता वाढली

पुण्यातील वाढत्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटनेने नागरिकांची चिंता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांचा मुलगा सौरभ गायकवाड याच्याकडून अपघात घडला. सौरभकडून दारुच्या नशेत मांजरी-मुंढवा रस्त्यावर झेड कॉर्नर हा अपघात झाला. या अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com