Pune Dam Water Storage: पुणेकरांना दिलासा! पाणी पुरवठा करणारी धरणे जवळपास १०० टक्के भरली; कोणत्या धरणात किती पाणीसाठा? वाचा...

Pune Dam Water Storage Details: पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रांमध्ये कालपासून जोरदार पाऊस बरसत आहे. पावसामुळे या चारही धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून पानशेत, वरसगाव आणि टेमघर या तीन धरणांतून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.
Pune Dam Water Storage: पुणेकरांना दिलासा! पाणी पुरवठा करणारी धरणे जवळपास १०० टक्के भरली; कोणत्या धरणात किती पाणीसाठा? वाचा...
Maharashtra Rain Dam Water Storage: Saamtv
Published On

सागर आव्हाड |पुणे, ता. २५ ऑगस्ट २०२४

पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पुणे शहरासह जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढला असून धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांसह जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्याची चिंता आता मिटल्याचे दिसत आहे.

Pune Dam Water Storage: पुणेकरांना दिलासा! पाणी पुरवठा करणारी धरणे जवळपास १०० टक्के भरली; कोणत्या धरणात किती पाणीसाठा? वाचा...
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे विदर्भातून कोणाला उमेदवारी देणार? पाहा VIDEO

पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रांमध्ये कालपासून जोरदार पाऊस बरसत आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे खडकवासला धरणातून दिवसभरात विसर्गामध्ये टप्प्याटप्याने वाढ करण्यात आली. पावसामुळे या चारही धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून पानशेत, वरसगाव आणि टेमघर या तीन धरणांतून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.

या तीन धरणांतून सोडलेले पाणी खडकवासला धरणात जमा होते. तसेच पाऊस पडताच ओढे-नाले वेगाने वाहू लागले. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. दिवसभरात खडकवासला धरणात 40, पानशेत- 116, वरसगाव-112 आणि टेमघर धरणात 150 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणात पाण्याचा येव्यात मोठी वाढ झाली.

Pune Dam Water Storage: पुणेकरांना दिलासा! पाणी पुरवठा करणारी धरणे जवळपास १०० टक्के भरली; कोणत्या धरणात किती पाणीसाठा? वाचा...
Buldhana Crime: शटर उचकटून आत शिरले, तब्बल १३ लाखांचे दागिने लुटले, बुलढाण्यात जबरी चोरी, घटना CCTVत कैद!

खडकवासला धरणातील विसर्ग

सकाळी 10 वा. – 1,462 क्युसेक

सकाळी 11 वा. – 2,140 क्युसेक

दुपारी 2 वा. – 8,734 क्युसेक

दुपारी 3 वा. – 12,958 क्युसेक

सायंकाळी 4 वा-19,118 क्युसेक

सायंकाळी 6 वा -.23,122 क्युसेक

रात्री 8 वा. – 27,841 क्युसेक

पानशेत धरणातील विसर्ग

सकाळी10 वा. – 1,449 क्युसेक

दुपारी 2 वा. – 3,996क्युसेक

सायंकाळी 4 वा. – 8,920 क्युसेक

वरसगाव धरणातील विसर्ग

दुपारी 2 वा. – 4,262 क्युसेक

सायंकाळी 4 वा. – 9,025 क्युसेक

टेमघर धरणातील विसर्ग

सकाळी 7 वा. -869 क्युसेक

Pune Dam Water Storage: पुणेकरांना दिलासा! पाणी पुरवठा करणारी धरणे जवळपास १०० टक्के भरली; कोणत्या धरणात किती पाणीसाठा? वाचा...
Maharashtra Politics : जनतेचा असंतोष दडपून टाकण्याचा प्रयत्न केला, पण उद्रेक कसा रोखणार? शिवसेना ठाकरे गटाचा संताप

कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

खडकवासला – 1.69 टीएमसी – 85.53 टक्के

पानशेत – 10.46 टीएमसी – 98.23 टक्के

वरसगाव – 12.76 टीएमसी -99.54 टक्के

टेमघर – 3.71 टीएमसी – 100 टक्के

एकूण – 28.62 टक्के – 98.18 टक्के

Pune Dam Water Storage: पुणेकरांना दिलासा! पाणी पुरवठा करणारी धरणे जवळपास १०० टक्के भरली; कोणत्या धरणात किती पाणीसाठा? वाचा...
Badlapur Case Update : बदलापुरात अफवांचा सुळसुळाट; खोटी पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी आणखी 4 जणांवर गुन्हे दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com